आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यातील सर्वच धरणांतून सुटणार आवर्तने

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक : आजपासून जिल्ह्यातील सर्वच धरणांतून पिण्यासोबतच सिंचनासाठीही पाणी दिले जाणार आहे. विशेष म्हणजे यंदा सोडण्यात येणाऱ्या पाण्याच्या सुरक्षेसाठी कुठलाही बंदोबस्त अथवा वीज पुरवठा खंडीत करण्यात येणार नसल्याने शेतकऱ्यांना रब्बीसाठी भरपूर पाणी मिळणार आहे.

दारणातून पाणी आवर्तनास १ डिसेंबरपासूनच सुरुवात झाली आहे. आता गंगापूर, आळंदी आणि पालखेडमधून पाणी सोडले जाणार आहे. आळंदीतून शेतीसाठी १५० दलघनफूट पाणी दिले जाणार आहे. त्यात मखमलाबाद, दरी, मातोरी, आडगावला हे पाणी दिले जाईल.
नाशिक डाव्या कालव्याद्वारे गंगापूरमधून २५० दलघनफूट पाणी कसबे सुकेणे, ओझर, पिंपळससह निफाडमधील काही गावांना हे पाणी दिले जाणार आहे. मंगळवारी सकाळीच पाणी सोडण्यात येणार असल्याचे नाशिक पाटबंधारे विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
१ डिसेंबरपासून दारणा धरणातून अर्थात नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यातून निघणाऱ्या गोदावरी डाव्या आणि उजव्या कालव्याचे आवर्तन सुरू आहे. शिर्डी, राहाता आणि पुणतांबेसाठी ५५० क्यूसेकने तर गोदावरी डाव्या कालव्याद्वारे कोपरगाव, वैजापूरला ३५० क्यूसेकने पाणी साेडले आहे.
त्याचबरोबर एक्स्प्रेस कॅनाॅलमधून ७५२ क्यूसेकने गंगापूर, वैजापूर तालुक्यांना पाणी दिले जात आहे. यातील बहुतांशी पाणी नदी व कालव्यामार्गे जायकवाडीला अर्थात मराठवाड्यासाठीच सोडण्यात येत आहे.
बातम्या आणखी आहेत...