आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यशस्वी करिअरसाठी पुढचे पाऊल; ‘दिव्य एज्युकेशन अॅण्ड करिअर फेअर’चा पालक-विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात समाराेप

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक: पारंपरिक अभ्यासक्रमांसह वेगळ्या करिअरच्या वाटा जाणून घेत शहरातील विद्यार्थ्यांनी यशस्वी करिअरच्या दिशेने पुढचे पाऊल टाकले आहे. दहावी बारावीच नव्हे तर पदव्युत्तर पदवी विद्याशाखांसह व्यावसायिक अभ्यासक्रमांतील करिअरचे पर्याय असो की, फॅशन डिझायनिंग, अॅनिमेशन, इंटेरिअर डिझायनिंग, फार्मसी, एमबीए, हॉटेल मॅनेजमेंट अशा वेगळ्या वाटांची माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध झाल्याने करिअर निवडीचा मार्ग सुकर झाला. ‘दिव्य मराठी’तर्फे आयोजित करण्यात आलेल्या ‘दिव्य एज्युकेशन अॅण्ड करिअर फेअर’ या शैक्षणिक प्रदर्शनास शहरातील विद्यार्थी पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. हजारोंच्या संख्येने विद्यार्थी पालकांनी भेट देत करिअरच्या विविध पर्यायांची माहिती जाणून घेतली. करिअरच्या निवडीनंतर आता खऱ्या अर्थाने ध्येयाच्या दिशेने वाटचाल सुरु झाली आहे. 
 
करिअरच्या विविध पर्यायांची माहिती व्हावी या उद्देशाने ‘दिव्य मराठी’तर्फे ‘दिव्य एज्युकेशन अॅण्ड करिअर फेअर’ या शैक्षणिक प्रदर्शनाचे लक्षिका मंगल कार्यालय येथे आयोजन करण्यात आले होते. सोमवारी (दि. २९) या प्रदर्शनाचा समारोप झाला. संदीप युनिव्हर्सिटी प्रस्तुत या प्रदर्शनाचे महात्मा गांधी विद्यामंदिर संस्था, आयएनआयएफडी, स्पेक्ट्रम, महेश ट्युटोरियल्स, के. व्ही. एन. नाईक या संस्था प्रायोजक होत्या. दोन दिवस चाललेल्या या प्रदर्शनास शहरातील विद्यार्थी पालकांनी मोठ्या संख्येने प्रत्येक स्टॉल्सला भेट देऊन करिअरच्या पर्यायांची माहिती जाणून घेतली. सोमवारी अखेरचा दिवस असल्याने प्रदर्शनाला विद्यार्थी पालकांचा उदंड प्रतिसाद लाभला. प्रदर्शनास भेट देणाऱ्या विद्यार्थ्यांमधून लकी ड्राॅद्वारे भाग्यवंत विजेत्यांना गिफ्ट वाटप करण्यात आले.
 
प्रदर्शनातील प्रत्येक स्टॉल्स वेगळ्या करिअरसाठी दिशादर्शक.. 
याप्रदर्शनात इंजिनिअरिंगपासून ते कोचिंग क्लासेस, फॅशन इन्स्टिट्यूट, एमबीए, अॅनिमेशन, इंटेरिअर, स्कूल ऑफ ब्युटी, आयआयटी अशा विविध पर्यायांचे असंख्य स्टॉल्स उपलब्ध असल्याने विद्यार्थी पालकांना करिअर निवडीविषयक आवश्यक असलेल्या सर्वच प्रश्नांची उत्तरे सहज मिळू शकली. प्रदर्शनात सहभागी प्रत्येक स्टॉल्स हा दिशादर्शक ठरला. या प्रदर्शनात संदीप युनिव्हर्सिटी, महात्मा गांधी विद्यामंदिर संस्था, आकाश इन्स्टिट्यूट, आयएनआयएफडी, महेश ट्युटोरियल्स, स्पेक्ट्रम, अशोका एज्युकेशन फाउंडेशन, गुरू गोविंद सिंग फाउंडेशन, एलटीए स्कूल ऑफ ब्युटी, के. के. वाघ शिक्षण संस्था, युनिव्हर्सल फाउंडेशन, संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट, सीजीएफसी, व्हर्सटाइल अकॅडमी, शिव फॅशन अकॅडमी, मिलिंद सर-मुनींद्रजी क्लासेस, कर्मवीर व्ही. एन. नाईक शिक्षण प्रसारक संस्था, अॅरेना अॅनिमेशन, आयआयटी पेस, धन्वंतरी इन्स्टिट्यूट ऑफ डिझायनिंग टेक्नॉलॉजी, स्मार्ट एज्युकेशन, बी. के. ग्रुप ऑफ एज्युकेशन या संस्थांचा समावेश होता. 
 
विद्यार्थी-पालकांना एक्स्पाेचा फायदा हाेईल 
या शैक्षणिक प्रदर्शनामुळे वेगवेगळ्या शिक्षणक्षेत्रातील करिअरविषयक पर्याय जाणून घेण्याची संधी मिळाली. याचा फायदा विद्यार्थी पालकांना करिअर निवडताना नक्की होईल. पूजा धामणे, विद्यार्थी 
 
कृषी क्षेत्रातही करिअरची उत्तम संधी 
कृषिप्रधान देशाच्या आर्थिक प्रगतीमध्ये कृषी क्षेत्राला मोठे महत्त्व आहे. शेतीच्या उत्पादन वाढीत कृषी शिक्षणाचा संशोधनाचा मोलाचा वाटा असल्याने कृषी विषयक शिक्षणात करिअर करणाऱ्या पदवीधरांना नोकरीच्या उत्तम संधी खुणावत आहे. उत्पादकता वाढविण्यासाठी, तसेच कृषिसंलग्न व्यवसायाची भरभराट होण्यासाठी कृषी कृषिसंलग्न विषयातील शिक्षणाला महत्त्व प्राप्त झाले आहे. कृषी शिक्षणासह पुरक व्यवसायांतील दुग्ध उत्पादन, कुक्कुटपालन, पशुसंवर्धन याकडे व्यवसाय म्हणून पाहिले जात असल्याने उद्योगाच्या संधी आहे. कृषीमध्ये बी.एस्सी. अॅग्री, उद्यानविद्या, कृषी अभियांत्रिकी, कृषी व्यवसाय व्यवस्थापन, अन्न-तंत्रज्ञान, कृषी जैवतंत्रज्ञान असे विविध अभ्यासक्रम असून कृषी विद्यापीठांशी संलग्नित कृषी महाविद्यालयांत विद्यार्थ्यांना बारावीनंतर पदवीला प्रवेश घेण्याची संधी असते, त्यामुळे विद्यार्थ्यांनी कृषीची आवड असलेल्या विद्यार्थ्यांनी या क्षेत्रात करिअर करावे, असे आवाहन एमजीव्ही संचलित कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. व्ही. एस. पवार यांनी कृषी शिक्षणातील करिअर संधी विषयावरील सेमिनारमध्ये विद्यार्थ्यांना केले. 
 
अन् अवघड गणित झाले सोपे... 
विद्यार्थ्यांना गणित विषय किचकट अवघड वाटत असतो. विद्यार्थ्यांच्या मनात गणित विषयाची भीती असल्याने मग बोर्डाच्या परीक्षेमध्येही कमी गुण मिळतात. परंतु, गणित हा विषय अत्यंत सोपा असून तो चांगल्या पद्धतीने समजून घेतल्यास प्रत्येकाला त्याविषयी आवड निर्माण होईल. इयत्ता सातवी ते दहावीपर्यंतच्या गणित सोडविताना सोप्प्या पद्धतींचा वापर केला तर गणिताचा पाया भक्कम होण्यास मदत होईल. गणितामधील अवघड उदाहरणे अतिशय सोप्प्या पद्धतीने सोडवून दाखविल्याने विद्यार्थ्यांनीही हसतखेळत धडे गिरवले. निमित्त होते, महेश ट्युटोरियल्सतर्फे आयोजित मार्गदर्शनपर चर्चासत्राचे. विद्यार्थ्यांना इयत्ता नववीचा बदलेल्या अभ्यासक्रमाविषयी माहिती जाणून घेतली. करा गणिताशी मैत्री जाणून घ्या वीचा बदललेला अभ्यासक्रम या विषयावर महेश ट्युटोरियल्सचे संचालक नीलेश सौदागर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. गणित विषय सोप्या पद्धतीने समजून घेतल्यास त्याची भीती वाटता त्याविषयी आवड निर्माण होईल. गणितामध्ये चिन्हांचा वापर करून सोप्या पद्धतींचा अवलंब करता येईल, असे आवाहनही त्यांनी विद्यार्थ्यांना केले. 
 
बातम्या आणखी आहेत...