आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Divya Education And Career Faire News In Marathi, Divya Marathi, Education

विद्यार्थी व पालकांसाठी ‘दिव्य’ पर्वणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - दैनिक दिव्य मराठीतर्फे शहरात दिव्य एज्युकेशन अँड करिअर फेअर 2014 या शैक्षणिक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. 23 ते 25 मेपर्यंत सिटी सेंटर मॉल येथे हे प्रदर्शन होणार आहे.‘दिव्य मराठी’च्या नाशिकमधील या पहिल्याच उपक्रमाची सुरुवात दिमाखदार उद्घाटनाने होणार आहे.

विद्यार्थी व पालकांना त्यांच्या मनातील शिक्षणासंदर्भातील अनेक प्रश्नांची उत्तरे या प्रदर्शनात मिळतील. मेडिकल, इंजिनिअरिंग, विद्यापीठे, लॉ कॉलेज, आयटी संस्था, महाविद्यालये, दूरस्थ शिक्षण, रिटेल मॅनेजमेंट, हॉटेल मॅनेजमेंट, ग्राफिक्स, इंटेरियर डिझाइन, परदेशी भाषा, फायनान्स अँड मॅनेजमेंट, बँक्स, आर्किटेक्चर, मास कम्युनिकेशन, मीडिया व अँनिमेशन, कल्चरल अँड एज्युकेशन डिपार्टमेंट, म्युझिक, फाइन आर्ट, इंग्लिश स्पीकिंग यांसह विविध अभ्यासक्रम देणार्‍या संस्थांना सहभागी होण्याची संधी उपलब्ध होणार आहे. आपल्या सेवा व विषय हजारो विद्यार्थी व पालकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शिक्षण क्षेत्रातील व निगडित व्यावसायिकांना ही पर्वणीच ठरणार आहे.

या प्रदर्शनात मोठय़ा प्रमाणात संस्थांनी सहभाग नोंदवला असून, निवडक व मोजक्याच स्टॉल्ससह या प्रदर्शनाची उभारणी प्रशस्त हॉलमध्ये होणार असल्याने आजच आपला स्टॉल निश्चित करा. अधिक माहितीसाठी हेमंत पवार (7507773925) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन ‘दिव्य मराठी’तर्फे करण्यात आले आहे. या प्रदर्शनासाठी महेश ट्युटोरियल्स यांचे ‘टायटल’ म्हणून, तर कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटचे ‘पॉवर बाय’ म्हणून सहकार्य लाभले आहे.

सहभागी संस्था
महेश ट्युटोरियल्स, कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट, मातोर्शी आयआयटी फाउंडेशन, सिलिकॉन व्हॅली, जिनिअल ग्रुप, सायन्स अकॅडमी, व्हायब्रेशन म्युझिक अकॅडमी, त्रिंबक एज्युकेशन सोसायटी, सीजीएफसी करिअर गाइडन्स, अँसेंट अकॅडमी, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ इन्व्हेस्टिगेशन, आयसीए, रिलायबल अकॅडमी, क. का. वाघ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, आयएनआयएफडी फ्रेमवर्क्‍स, आयआयटी स्पेस.