आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यार्थी पालकांसाठी शहरात दिव्य पर्वणी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - दैनिक‘दिव्य मराठी’तर्फे ‘दिव्य एज्युकेशन अ‍ॅण्ड करिअर फेअर २०१५’ हे शैक्षणिक प्रदर्शन २९ ते ३१ मेदरम्यान पिनॅकल माॅल, त्र्यंबकनाका येथे हाेणार आहे. ‘दिव्य मराठी’च्या शहरातील या उपक्रमाची सुरुवात दिमाखदार उद््घाटनाने करण्यात येणार आहे. विद्यार्थी पालकांना त्यांच्या मनातील शिक्षणासंदर्भात अनेक प्रश्नांची उत्तरे या प्रदर्शनात मिळतील.

मेडिकल, इंजिनिअरिंग, लाॅ काॅलेज, आय. टी. संस्था, महाविद्यालये, दूरस्थ शिक्षण, रिटेल मॅनेजमेंट, हाॅटेल मॅनेजमेंट, हाॅस्पिटॅलिटी, ग्राफिक्स, इंटेरियर डिझाइन, परदेशी भाषा, फायनान्स अ‍ॅण्ड मॅनेजमेंट, बॅक्स, आर्किटेक्चर, मासकाॅम, मीडिया अ‍ॅनिमेशन, कल्चर अ‍ॅण्ड एज्युकेशन, डिपार्टमेंट, म्युझिक, फाइन आर्ट, काेचिंग क्लास, इंग्लिश स्पीकिंग यांसह विविध अभ्यासक्रम देणार्‍या िवविध संस्थांना सहभागी हाेण्याची संधी उपलब्ध हाेणार आहे. आपल्या सेवा विषय हजाराे विद्यार्थी पालकांपर्यंत पाेहाेचविण्यासाठी शिक्षण क्षेत्रातील निगडित व्यावसायिकांना ही पर्वणीच ठरणार आहे.

प्रदर्शनात माेठ्या प्रमाणात संस्थांचा सहभाग
याप्रदर्शनात माेठ्या प्रमाणात संस्थांनी सहभाग नाेंदवला असून, निवडक माेजक्याच स्टाॅलसह या प्रदर्शनाची उभारणी प्रशस्त वातानुकूलित हाॅलमध्ये हाेणार असल्याने आजच आपला स्टाॅल निश्चित करा. अधिक माहितीसाठी स्टाॅल नाेंदणीसाठी हेमंत पवार ७५०७७७३९२५ मनीष ठाकूर ८३९०९११६७१ यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन ‘दिव्य मराठी’तर्फे करण्यात आले आहे. या प्रदर्शनासाठी उडूपी स्पाइस यांचे फूड पार्टनर, तर पिनॅकल यांचे व्हेन्यू पार्टनर म्हणून सहकार्य लाभले आहे.
बातम्या आणखी आहेत...