आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘दिव्य एज्युकेशन अँड करिअर फेअर 2014’ला प्रारंभ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- आधुनिक युगातील शेकडो करिअरविषयक माहिती व मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळण्याच्या उद्देशाने दैनिक दिव्य मराठी व महेश ट्युटोरियल्स यांच्या संयुक्त विद्यमाने ‘दिव्य एज्युकेशन अँड करिअर फेअर’ या उपक्रमास सिटी सेंटर मॉलमध्ये शुक्रवारी थाटात प्रारंभ झाला. पहिल्याच दिवशी स्टॉल्सवर विद्यार्थी व पालकांची गर्दी झाली होती.
या तीनदिवसीय उपक्रमाचे उद्घाटन आरोग्य व विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. अरुण जामकर यांच्या हस्ते झाले. विद्यार्थ्यांना एकाच ठिकाणी नावीन्यपूर्ण करिअरच्या संधी शोधता येणार आहेत. उद्घाटनप्रसंगी मान्यवरांसह विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. ‘करिअर फेअर 2014’मध्ये तीसहून अधिक नामांकित शैक्षणिक संस्था सहभागी असून, अभियांत्रिकी, मॅनेजमेंट, डिझाइन, शिक्षण कर्जाविषयी माहिती असलेल्या स्टॉल्सचा त्यात समावेश आहे.