आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सहकारातून समस्यामुक्ती, महापालिका आता देणार शहरातील उद्याने दत्तक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- शहराची फुफ्फुसे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उद्यानांची देखभाल संवर्धन करण्यासाठी ‘दिव्य मराठी’ने ‘सहकारातून समस्यामुक्ती’ या उपक्रमांतर्गत चालवलेल्या अभियानात आता निर्णायक पाऊल पडणार आहे. महापालिकेला स्वत:च्या यंत्रणे मार्फत उद्यानांची देखभाल होऊ शकणार नाही, याची जाणीव झाल्याने परिणामी आता शहरातील स्वयंसेवी संस्था, दानशूर, बड्या कंपन्या वा उद्योजक तथा मान्यवरांना उद्याने देखभालीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी इच्छुकांकडून ‘एक्स्प्रेस ऑफ इंट्रेस’ अर्थातच प्रस्तावही महापालिका मागवत आहे.
नाशिक शहरात साडेचारशेहून अधिक उद्याने असून, त्यांच्या देखभाल-दुरुस्तीचा प्रश्न नेहमीच वादात राहिला आहे. बचतगट स्वयंसेवी संस्थांना प्रतिएकर दहा हजार रुपये याप्रमाणे देखभालीसाठी दिलेल्या खर्चात उद्यानांची व्यवस्थित देखभाल होत नव्हती. जानेवारी महिन्यात आयुक्तांच्या ही बाब निदर्शनास आल्यावर त्यांनी देखभालीची कामे थांबवली.
त्यामुळे उद्याने कोमेजण्याची भीती निर्माण झाली. त्यानंतर साडेसात कोटी रुपयांचा ठेका देखभालीसाठी ठेवण्यात आला. त्यास महासभेत विरोध करून एकाच संस्थेला कामे देता बचतगट स्वयंसेवी संस्थांना कामे देण्याचा निर्णय झाला. दरम्यान, त्याची अंमलबजावणी रखडली असताना आता उद्यान विभागाने नवीन प्रस्ताव तयार केला आहे.
आकर्षक पुरस्कार देणार : देखभालीसाठी दिलेल्या उद्यानांची पाहणी करून चांगले व्यवस्थापन करणाऱ्या संस्थांना आकर्षक पुरस्कार दिला जाणार आहे. जेणेकरून चांगली उद्याने निर्माण हाेतील पुरस्कारामुळे काम करणाऱ्यांचे मनोधैर्य वाढेल, किंबहुना त्यांना प्रोत्साहन मिळेल.
पुढील स्लाइडवर क्लिक करून वाचा, म्हसरूळला होणार ट्री पार्क...काय आहे प्रस्ताव?...
बातम्या आणखी आहेत...