आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

वर्धापनदिन: ‘दिव्य मराठी’शी नाते झाले दृढ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - रविवारी पहाटेपासून काेसळलेल्या जलधारांप्रमाणेच सायंकाळी ‘दिव्य मराठी’वर नाशिककरांनी हार्दिक शुभेच्छांचा वर्षाव केला. पाचव्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने अायाेजित स्नेहमीलन साेहळ्यास विविध क्षेत्रातील मान्यवरांसह हजाराे नागरिकांनी उपस्थिती दर्शवून स्नेहसदिच्छा प्रदान करीत ‘दिव्य मराठी’शी स्नेहाचे ऋणानुबंध अाणखी दृढ केले.

तुपसाखरे लाॅन्स येथे झालेला स्नेहमीलनाचा हा साेहळा पावसाच्या दमदार अागमनाइतकाच सुखद ठरला. नाशिकमध्ये पाच वर्षांपूर्वी दाखल झाल्यापासून जनसामान्यांच्या प्रश्नांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देतानाच सामान्यांचे प्रश्न मांडल्याने अाणि त्यांच्या समस्या साेडविण्यासाठी राेखठाेक भूमिका घेतल्याने ‘दिव्य मराठी’ अल्पावधीत नाशिककरांच्या मनात रुजला. शहरातील सर्वाधिक खपाचे दैनिक म्हणून लाैकिक मिळवितानाच नाशिक शहरामध्ये राबविलेल्या विविध उपक्रमांमुळे शहरवासीयांच्या समस्या साेडविण्यात पुढाकार घेतल्याने वाचकांच्या हृदयावर अधिराज्य गाजवत त्यांच्या मनात ‘दिव्य मराठी’ने अढळ स्थान निर्माण केले. हेच नाते जिवापाड जपत हजाराे नागरिकांनी ‘दिव्य मराठी’ला शुभेच्छा देण्यासाठी भरपावसातही साेहळ्यास हजेरी लावली. शहरवासीयांच्या प्रेम अाणि उत्साहामुळे पाचवा वर्धापनदिन साेहळा दरवर्षीप्रमाणेच अविस्मरणीय असा ठरला.

लोकप्रतिनिधी, अधिकारी उपस्थित
वर्धापनदिनानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी अालेल्या मान्यवरांचा अाेघ रात्रीपर्यंत सुरू हाेता. राज्य संपादक प्रशांत दीक्षित यांच्या मुख्य उपस्थितीत रंगलेल्या या सोहळ्यात महापाैर अशाेक मुर्तडक, खासदार हेमंत गाेडसे, अामदार बाळासाहेब सानप, देवयानी फरांदे, सीमा हिरे, डॉ. राहुल आहेर, जयवंत जाधव, राजाभाऊ वाजे निर्मला गावित, तसेच महसूल अायुक्त एकनाथ डवले, महापालिका अायुक्त डाॅ. प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., पाेलिस अायुक्त एस. जगन्नाथन आदींनी ‘दिव्य मराठी’स मन:पूर्वक शुभेच्छा दिल्या.
बातम्या आणखी आहेत...