आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘दिव्य मराठी’ उत्सव: नवे काव्य अन‌् सुरावटींना रंगस्पर्शी दाद...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - एकीकडे भावना काव्यातून उलगडतात.. तेच काव्य मधुरस्वरांनी सुरावटींवर येते.. त्याला रसिकांची अाऽऽहा ही दाद मिळते, ताेच दुसरीकडे त्या शब्दसुरांना साद घालताे ताे कुंचला अाणि काव्यगीताच्या माेहिनीत स्वत:ला हरवत रंगांची उधळण करताे.. अन् मग दर्दी रसिक म्हणून जाताे.. वाह क्या बात है.. ही दाद असते शब्दाला, काव्याला, गीताला, सुरांना अन् रंगभावनांच्या चित्रांना.
‘दिव्य मराठी’च्या चाैथ्या वर्धापनदिनानिमित्त अायाेजित उत्सवात ‘स्वप्नसूर’ या कार्यक्रमात रसिकांनी ही अनाेखी अनुभूती अापल्या अाठवकुपीत साठवली अन् प्रत्येक कलेला भरभरून दाद दिली. ‘स्वप्नसूर’ ‘गीत नवे.. संगीत नवे...’ हे ब्रीद घेऊन नव्यानेच रंगमंचावर सादर झालेल्या या कार्यक्रमाला रसिकांचा उदंड प्रतिसाद हाेता. नव्या गीतकारांच्या शब्दांना नव्या संगीतकारांनी स्वरबद्ध केले गायिका स्वप्नजा लेले यांनी ती नवता अापल्या मधुरस्वरांनी रसिकांच्या अाेंजळीत टाकली. एकीकडे गाणी, दुसरीकडे त्या गाण्याच्या भावना रंगांतून उमटत हाेत्या. हे हाेत असतानाच याेगेश देशपांडे यांच्या खुमासदार संवादाने रसिकांना कार्यक्रमात एकरूप केले. यावेळी ‘दिव्य मराठी’चे जनरल मॅनेजर मदनसिंग परदेशी, निवासी संपादक जयप्रकाश पवार यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात अाला. कार्यक्रमाची संकल्पना, निर्मिती शैलेश लेले यांची हाेती. स्वप्नजा यांना की-बाेर्डवर काैस्तुभ देशपांडे यांनी साथ केली.

जगणं अाणि सध्याच्या माेबाइल कंपन्या हे कसं सारखं अाहे, हे सांगताना याेगेश म्हणतात,
काॅलेजलाइफ रिलायन्स की तरह है
करलाे दुनिया मुठ्ठी में...
बॅचरल लाइफ एअरटेलकी तरह है
एेसी अाझादी अाैर कहा...
हेसगळं रसिकांना अगदी अापलंच वाटत हाेतं, म्हणूनच प्रत्येक अाेळीला टाळ्यांची दाद मिळत हाेती. असा जगण्यातील एक क्षण स्वप्नजा यांनी गीतातून उलगडला...
धुंदल्याया क्षणी.. गुंफल्या भावना
थांबले श्वास अन्.. जागल्या संवेदना.. थांबना रे क्षणा...
जगण्यातलेकाही क्षण हे थांबावेसेे वाटतात, या भावना या शब्दांतून व्यक्त हाेतात. या भावना असतात प्रेमाच्या, पण त्याच वेळी गंमत घडते अन‌् मग याेगेश म्हणतात...
तिलाम्हणालाे, मला अाजकाल झाेप येत नाही
काय करू मला तुझी अाठवण झाेपूच देत नाही...
प्रेमातपडल्यावर सगळीकडे त्याला ती अाणि तिला ताे दिसत असताे. मग स्वत:लाच निरखून बघावेसे वाटते... अन् पुन्हा स्वप्नजा राजवाडेंनी संगीतबद्ध केलेले
माझेमलाच डाेळे, पाण्यात पाहते का...
माझ्या हाती निराळे, हे रूप दाविते का...
बातम्या आणखी आहेत...