आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘ज्युनियर एडिटर’ बनण्याची विद्यार्थ्यांना संधी!

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र: ‘दिव्य मराठी ज्युनियर एडिटर’ या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचा मंगळवारी नाशिकमध्ये प्रारंभ करताना केटीएचएम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे.
नाशिक - शाळा आणि कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेचा योग्य विकास व्हावा, हा प्रत्येक शैक्षणिक संस्थेचा हेतू असतो. हाच नवनिर्मितीचा हेतू डोळ्यासमोर ठेवत दैनिक भास्कर समूहांतर्गत ‘दिव्य मराठी ज्युनियर एडिटर’ ही राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा घेण्यात येणार आहे. या स्पर्धेचा प्रारंभ केटीएचएम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आला.

‘ज्युनियर एडिटर’ या झी क्यू प्रस्तुत राष्ट्रीय स्पर्धेमध्ये इयत्ता पहिली ते इयत्ता बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना दैनिक भास्करचे वृत्तपत्र तयार करण्याची संधी मिळणार आहे. भारतातील तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवरील मानाचे लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, वन इंफ्रा-इंडिया यांसारखे विक्रम मिळविणारी ही स्पर्धा आहे. विद्यार्थ्यांच्या भाषिक आणि बौद्धिक नैपुण्याला व्यासपीठ मिळावे, यासाठी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. विविध शाळा तसेच कनिष्ठ महाविद्यालयांच्या सक्रिय सहभागाने ‘दिव्य मराठी’ विद्यार्थ्यांपर्यंत ही स्पर्धा पोहोचवणार आहे. शिवाय या स्पर्धेसाठी तब्बल चार हजारांपेक्षा जास्त बक्षिसे दिली जाणार आहेत. ज्यामध्ये विद्यार्थ्यांना ‘दिव्य मराठी’तर्फे वृत्तपत्राचे एक किट दिले जाईल, या किटवर त्यांनी आपल्या कल्पकतेने मजकूर भरून स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचे आहे. या स्पर्धेच्या किटचे अधिकृत प्रकाशन ‘दिव्य मराठी’च्या कार्यालयात मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले आहे.

या कार्यक्रमासाठी ‘दिव्य मराठी’चे निवासी संपादक जयप्रकाश पवार यांच्यासह शहरातील विविध नामांकित शाळांचे मुख्याध्यापक, ज्येष्ठ शिक्षक प्रतिनिधी आणि कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य उपस्थित होते. ज्यामध्ये एचपीटी, आरवायके कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य विष्णू उगले, नवजीवन पब्लिक स्कूलचे मुख्याध्यापक एन. एस. गायकवाड किरण चौहान, दिल्ली पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका चित्रा जोशी, रचना विद्यालयाच्या शिक्षिका एम. बी. माळी, अशोका युनिव्हर्सल स्कूलचे श्रीपाल शहा, केटीएचएम महाविद्यालयाचे प्रा. अशोक सोनवणे, एच. डी. पाटील, ज्युनियर एडिटर-२ चा विजेता सुजय परदेशी, मंगेश परदेशी यांच्यासह ‘दिव्य मराठी’चे डेप्युटी एडिटर अभिजित कुलकर्णी, राकेश चतुर्वेदी, प्रशांत चौधरी, हेमंत सोने, हेमंत पवार या मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले.

नो निगेटिव्ह थीम...
विद्यार्थ्यांनाहे वर्तमानपत्र नो निगेटिव्ह लाईफच्या आधारावर तयार करायचे आहे. याचाच अर्थ नकारात्मक विचार बाजूला ठेवून आयुष्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहण्याची संधी विद्यार्थ्यांना ‘दिव्य मराठी’च्या माध्यमातून मिळणार आहे.

हा उपक्रम एक पर्वणी
दैनंदिन अभ्यासक्रमात विद्यार्थी कंटाळतात, त्यांच्या माध्यमातून विकास साध्य करण्यासाठी नवीन संधींची आवश्यकता असते. यामुळे हा उपक्रम महाविद्यालये शाळांसाठी आनंदाची पर्वणीच आहे. -प्रा. विष्णू उगले, प्राचार्य, एचपीटी, आरवायके कनिष्ठ महाविद्यालय

विद्यार्थ्यांना व्यासपीठ मिळाले...
या स्पर्धेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मोठे व्यासपीठ मिळणार आहे. या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांच्या कार्यक्षमतेचा कस लागणार आहे. आम्ही जरूर या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहोत. - चित्रा जोशी, मुख्याध्यापिका दिल्ली पब्लिक स्कूल

समाजापर्यंत पोहोचण्याची संधी...
विद्यार्थ्यांचे विश्व मर्यादित राहता, त्यांना समाजातील विविध वंचित घटकांपर्यंत पोहोचण्याची संधी उपलब्ध होणार आहे. त्यांची जाणीव या निमित्ताने जागृत होणार आहे. या स्तुत्य उपक्रमाचे स्वागत करत सहभागी होणार आहोत. एन.एस. गायकवाड, मुख्याध्यापक,
नवजीवन पब्लिक स्कूल
‘दिव्य मराठी ज्युनियर एडिटर’ या स्पर्धेच्या किट प्रकाशनप्रसंगी केटीएचएम महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलीप धोंडगे, दै. ‘दिव्य मराठी’चे निवासी संपादक जयप्रकाश पवार यांच्यासह एचपीटी, आरवायके कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य विष्णू उगले, नवजीवन पब्लिक स्कूलचे मुख्याध्यापक एन. एस. गायकवाड किरण चौहान, दिल्ली पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापिका चित्रा जोशी, रचना विद्यालयाच्या शिक्षिका एम. बी. माळी, अशोका युनिव्हर्सल स्कूलचे श्रीपाल शहा, केटीएचएम महाविद्यालयाचे प्रा. अशोक सोनवणे, एच. डी. पाटील, ज्युनियर एडिटर-२ चा विजेता सुजय परदेशी, मंगेश परदेशी आदी.

निर्मितीशीलतेचा स्तुत्य उपक्रम
‘दिव्य मराठी ज्युनियर एडिटर’ हा ‘दिव्य मराठी’ने विद्यार्थ्यांसाठी सुरू केलेला उपक्रम विद्यार्थ्यांतील नैपुण्य प्रकट करणारा आहे. यासाठी आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी होतील, असे आश्वासन देतो. या निर्मितीशीलतेच्या उपक्रमासाठी मी स्वतः विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहे. विद्यार्थ्यांना प्रावीण्य मिळविण्याची ही नामी संधी दिसून येते. प्रा.डॉ. दिलीप धोंडगे, प्राचार्य, केटीएचएम कॉलेज

असे मिळवा स्पर्धेचे किट...
यास्पर्धेचे किट प्रवेश अर्ज ‘दिव्य मराठी’च्या कार्यालयातील एसएमडी विभागामध्ये बुधवार (दि. ३०) पासून सकाळी ११ ते सायंकाळी पर्यंत उपलब्ध होणार आहेत. सुटीचे दिवस सोडल्यास अधिक माहितीसाठी ९८८१७७३७२५याक्रमांकावर कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा.
कार्यालयाचा पत्ता : ‘दिव्यमराठी’, प्लॉट नंबर १, शीतल अॅव्हेन्यू, चांडक सर्कल, नाशिक.

स्पर्धेचे स्वरूप असे...
हीस्पर्धा चार गटांमध्ये होणार आहे. ज्यामध्ये पहिली ते तिसरीचा पहिला गट, चौथी ते सहावीचा दुसरा, सातवी ते नववीचा तिसरा आणि दहावी ते बारावीचा शेवटचा गट असणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना ५० रुपयांचा प्रवेश अर्ज आणि किट घ्यायचे आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्यांनी किट भरून ‘दिव्य मराठी’कडे जमा करायची आहे. या स्पर्धेसाठी चार हजारांपेक्षा जास्त बक्षिसे असून, यामध्ये लॅपटॉप, आयपॅड शैक्षणिक साहित्य यांसह विशिष्ट शिष्यवृत्ती मिळविण्याचीदेखील संधी मिळते.