आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी लिटरेचर फेस्टिव्हल; कलाकारांची मांदियाळी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- मराठी साहित्याच्या उत्सवाला एक वेगळा अायाम देण्याच्या उद्देशाने ‘दिव्य मराठी’तर्फे नाशकात ११, १२ अाणि १३ नाेव्हेंबर रोजी हाेत असलेल्या लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे, नाटककार सतीश अाळेकर, अजित दळवी यांच्यासह दिग्दर्शक अाशुताेष गाेवारीकर, गिरीश कुलकर्णी, निपुण धर्माधिकारी हे मान्यवर विविध परिसंवादंामध्ये सहभागी होतील.

राजहंस प्रकाशन व कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा फेस्टिव्हलमध्ये सक्रिय सहभाग आहे. राजहंस प्रकाशन ‘नॉलेज पार्टनर’ आहेत. याशिवाय एबीपी माझा, वेस्टलँड, वाणी प्रकाशन आणि ‘एक्स्प्रेस इन’ यांचेही महोत्सवासाठी योगदान असेल.

फेस्टिव्हलचे उद््घाटन ज्येष्ठ लेखिका, दिग्दर्शिका सई परांजपे यांच्या हस्ते होत अाहे. मराठी साहित्याचा जागर व्हावाच, पण त्याला नाटकाच्या व सिनेमाच्या अनुषंगाने येणाऱ्या साहित्याचीही जाेड मिळावी, असा प्रयत्न या उत्सवातून होत अाहे. त्यामुळेच तीन दिवस साहित्यिकांबराेबरच नाटक-सिनेमातून तेच साहित्य काैशल्याने हाताळणारे कलाकार व दिग्दर्शकही साहित्य रसिकांच्या भेटीला येत अाहेत. यात अाशुताेष गाेवारीकर विशेष सत्र घेेेतील. ज्येष्ठ नाटककार सतीश अाळेकर, अजित दळवी परिसंवादात असतील. गिरीश कुलकर्णी, केदार शिंदे, अभिराम भडकमकर, निपुण धर्माधिकारी हे अाघाडीचे दिग्दर्शक चित्रपट-नाटक व साहित्याचे नाते उलगडणार अाहेत. ‘राजकीय व्यंगचित्र’ असा वेगळा विषय मनसे अध्यक्ष राज ठाकरे स्वत:च उलगडणार अाहेत. तर, उद्योजकांच्या अात्मकथनासंदर्भात गाेकुळ डेअरीचे अरुण नरके, जैन इरिगेशनचे अशाेक जैन व स्टाेअरवेलचे लाेकेश शेवडे संवाद साधतील. कादंबरीकारांशी संवाद या विषयावर संजय भास्कर जाेशी, रंगनाथ पठारे, प्रवीण बांदेकर बोलतील. लता मंगेशकरांची बायाेग्राफी-सूरगाता तसेच शिवाजी-चॅलेंजिंग डेस्टिनी या मेधा देशमुख-भास्करन यांनी लिहिलेल्या पुस्तकांचे प्रकाशनही उत्सवात हाेणार अाहे.
बातम्या आणखी आहेत...