नाशिक - नागरी समस्यांची साेडवणूक करण्याच्या हेतूने ‘दिव्य मराठी’ने शहरातील प्रत्येक प्रभागात विकास मंच अभियान राबवून तब्बल ३१ हजार प्रश्नांना वाट माेकळी करून दिली. त्यातील अनेक प्रश्न दरम्यानच्या काळात मार्गीही लावले, मात्र अद्यापही त्या त्या ठिकाणच्या काही समस्या कायम अाहेत. महापालिकेची निवडणूक अवघ्या चार महिन्यांवर येऊन ठेपली असताना अाता या समस्यांचा ऊहापाेह करण्यासाठी, तसेच त्यांचा पाठपुरावा करून त्या लवकरात लवकर मार्गी लावाव्यात, या हेतूने ‘दिव्य मराठी विकास मंच’ अभियानाचा पुढचा टप्पा म्हणून ‘पडताळणी प्रभागाची’ ही अभ्यासपूर्ण सर्वसमावेशक मालिका मंगळवारपासून सुरू करत अाहोत.
यापूर्वी नागरिकांनी मांडलेल्या प्रश्नांची साेडवणूक झाली अाहे का, नसेल झाली तर त्यासाठी नगरसेवक काय कारणे सांगत अाहेत, या कारणांमध्ये तथ्य अाहे का, समस्या निर्मूलनाकरिता अन्य काही पर्याय अाहेत का हे अाणि अशा अनेक प्रश्नांचा धांडाेळा यामध्ये घेण्यात येणार अाहे. अर्थात, यात प्रत्येक प्रभागातील नागरिक हाच केंद्रबिंदू असणार अाहे.
२३ नाेव्हेंबर २०१३ पासून सुरू केलेल्या ‘दिव्य मराठी विकास मंच’ अभियानाच्या पहिल्या टप्प्याचा समाराेप १८ अाॅक्टाेबर २०१५ राेजी झाला. या अभियानांतर्गत महानगरपालिका क्षेत्रातील अाराेग्य, रस्ते, शिक्षण, पाणीपुरवठा, नागरी सुरक्षा, वाहतूक, उद्याने अशा विविध सुविधांविषयक प्रश्न मांडण्यात अाले. तसेच, अनेक उपयुक्त सूचनाही नागरिकांनी केल्या. त्यापैकी अनेक समस्या मार्गी लावण्याचा प्रयत्न संबंधित नगरसेवकांनी केला. शहरातील लहान-माेठ्या समस्यांनी उग्र रूप धारण केल्यामुळे सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाल्याची बाब या अभियानादरम्यान निदर्शनास अाली. बऱ्याचशा प्रभागांत समस्यांचे स्वरूप अगदी छाेटे हाेते, परंतु त्या नगरसेवकांपर्यंत पाेहाेचत नव्हत्या किंवा नगरसेवक नागरिकांच्या प्रश्नांची दखल घेत नव्हते. त्यामुळे या समस्यांची साेडवणूक हाेत नव्हती. काही प्रभागांत नगरसेवक फिरकलेच नसल्याच्याही तक्रारी अाल्या. तर, काही प्रभागांत नगरसेवक केवळ अाश्वासनांची खिरापतच वाटत राहिल्याचे नागरिकांनी सांगितले. काही प्रभागातील नगरसेवक मात्र अतिशय प्रामाणिकपणे कामकाज करीत असल्याचेही अाढळून अाले. अभियानाच्या पहिल्या टप्प्यातील प्रश्नांचा पाठपुरावा ‘दिव्य मराठी’च्या वतीने दुसऱ्या टप्प्यात करण्यात येणार अाहे. यात ‘दिव्य मराठी’चे प्रतिनिधी प्रत्येक प्रभागात फिरून ‘ग्राउंड रिपाेर्ट’ देणार अाहेत. समस्या का सुटत नाही, याचा पाठपुरावा या माध्यमातून केला जाणार अाहे. नागरिकांना अापल्या प्रभागातील समस्या मांडावयाची असल्यास साेबत दिलेल्या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर लिखित स्वरूपात दुपारी दाेन वाजेच्या अात नावासह पाठवावी.
प्रभाग क्रमांक : २२
परिसर: साधूवासवानी राेड, हाेलाराम काॅलनी, कुलकर्णी काॅलनी, उदय काे. अाॅपरेटिव्ह साेसायटी, कॅनडा काॅर्नर, शरणपूर गावठाण, शासकीय दूध डेअरी, जिल्हा रुग्णालय, जलधारा साेसायटी, पी अँड टी काॅलनी, गाेदावरी साेसायटी, सहजीवन काॅलनी, अानंदवन काॅलनी, अद्वैत काॅलनी, संभाजीनगर, पर्णश्री काॅलनी, येवलेकर मळा, काॅलेज परिसर.
नगरसेवक: उत्तम कांबळे, याेगिता अाहेर.
समस्यामांडण्यासाठी व्हाॅट्सअॅप क्रमांक : ९९७५५४७६१६