आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘पाॅवर’फुल लग्न साेहळ्यासाठी लावलेले विद्युत खांब हटवले

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- महापालिकेतील‘पाॅवर’फुल अधिकाऱ्याच्या नातलगाच्या लग्नानिमित्त सातपूरच्या विद्युत विभागाने राताेरात लावलेल्या पथदीपांपैकी गुप्ता लाॅन्सच्या वाहनतळाजवळील दाेन दिवे असलेला खांबदेखील भल्या सकाळीच काढून टाकण्यात अाला. याबाबत ‘दिव्य मराठी’ने साेमवारी ‘विवाह समारंभासाठी पालिकेने लावले राताेरात दिवे’ या मथळ्याखाली सचित्र वृत्त प्रसिद्ध केले हाेते.
गंगापूरराेडवरील साेमेश्वर परिसरात सर्वत्र अंधाराचे साम्राज्य पसरलेले असते. प्रभागाचे नगरसेवक विलास शिंदे यांनी पथदीप बसविण्यासाठी पालिका प्रशासनाशी वेळाेवेळी पत्रव्यवहार केलेला अाहे. तसेच प्रभाग क्रमांक ५० मधील विविध भागात पथदीप नसल्याने चाेऱ्यांच्या प्रमाणातही वाढ झाली अाहे. या प्रभागाचे नगरसेवक सचिन भाेर यांनीदेखील विद्युत विभागाकडे अनेकवेळा पाठपुरावा केला अाहे. मात्र, मटेरियल शिल्लक नसल्याचे कारण सांगून त्यांना अंधारातच ठेवणाऱ्या प्रशासनातील बड्या अधिकाऱ्यांनी नातलगाच्या लग्नानिमित्त लाॅन्सच नव्हे, तर गंगापूरराेडवरील रस्त्याच्या दुतर्फा लखलखाट केला हाेता. यासाठी पाच नवीन पाेल बसविण्यात अाले अाहे. यातील एक पाेल गुप्ता गार्डनच्या वाहनतळाजवळ बसविण्यात अाला हाेता. याबाबतचे सचित्र वृत्त प्रसिद्ध हाेताच साेमवारी सकाळी विद्युत विभागाने पुन्हा चपळाई करत प्रवेशद्वारासमाेरील पाेल गायब करून सातपूरच्या विद्युत विभागाच्या मुख्यालयात अाणून ठेवला अाहे.
पालिका अायुक्तांकडे केली लेखी तक्रार
सातपूरविभागातील सर्वच प्रभागाच्या बहुतांश भागात विद्यूत पाेल नाहीत, ते बसविण्याबाबत चाैकशी केली असता साहीत्य नसल्याचे कारण सांगितले जाते. तर दुसरीकडे एका विवाह साेहळ्यासाठी पाच पाेल मंजुरी नसताना कसे काय बसविण्यात अाले, अशी लेखी तक्रार नगरसेवक सचिन भाेर यांनी महापालिका अायुक्तांकडे केली अाहे.
संबंधित अधिका-यांवर कारवाई करा-
गंगापूरराेडच्याकामासाठी पाेल काढण्यात आले अाहेत. ते पोल बसविण्याबाबत िवचारले असता साहित्य नसल्याचे सांगितले जाते. मग लग्न साेहळ्यासाठी पाेल कुठून अाणले, असा सवाल करत नगरसेवक विलास शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी आपण अायुक्तांकडे करणार असल्याचे "दिव्य मराठी'ला सांगितले.