आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘दिव्य मराठी’ प्राॅपर्टी एक्स्पाेचे शानदार उद‌्घाटन,इच्छामणी लाॅन्स येथे रविवारपर्यंत प्रदर्शन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- दैनिक दिव्य मराठीने अायाेजित केलेल्या ‘प्राॅपर्टी एक्स्पाेचे’ उद्घाट न शुक्रवारी (दि. २४) महापाैर अशाेक मुर्तडक यांच्या हस्ते झाले. यावेळी स्थायी समितीचे सभापती सलीम शेख, क्रेडाई नाशिकचे अध्यक्ष सुनील काेतवाल, नरेश कारडा, अशाेका रिअॅलिटीचे प्राेजेक्ट हेड अनुप कटारिया, ‘दिव्य मराठी’चे महाव्यवस्थापक मदनसिंह परदेशी, निवासी संपादक जयप्रकाश पवार अादी व्यासपीठावर हाेते.

शहरात विभागीय स्तरावर दाेन प्राॅपर्टी प्रदर्शनाचे अायाेजन यापूर्वी ‘दिव्य मराठी’ने केले असून, यातून अनेकांचे गृहस्वप्न पूर्ण झाले अाहे. उपनगर येथील इच्छामणी लाॅन्स येथे सुरू झालेल्या या प्रदर्शनाला पहिल्याच दिवशी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. अशाेका रिअॅलिटी प्रस्तुत अाणि रुंग्ठा ग्रुप बिल्डर्स अॅण्ड डेव्हलपर्स यांच्या विशेष सहकार्याने या प्राॅपर्टी एक्स्पाेत ‘केवळ स्वप्नातील घरच नाही तर घरासाठी सर्व काही’ नाशिककरांना एकाच छताखाली उपलब्ध झाले अाहे. या प्रदर्शनात नामांकित बांधकाम व्यावसायिकांचे तीस स्टाॅल्स असून शहराच्या विविध भागातील गृहप्रकल्प, व्यावसायिक प्रकल्प, बंगलाेज, फ्लॅट्स, प्लाॅट्स असे किमान दाेन हजारांवर पर्याय उपलब्ध अाहेत. दरम्यान, रविवार(२६ जून)पर्यंत दरराेज सकाळी ११ ते सायंकाळी वाजेपर्यंत प्रदर्शन सुरू अाहे. प्रदर्शन नि:शुल्क अाहे.

उत्तम अायाेजन
‘दिव्यमराठी’कडूनक्रेडाईला कायमच सहकार्य िमळत अाले अाहे. त्याचबराेबर यांसारख्या अतिशय चांगली मांडणी सुविधा उपलब्ध करून िदलेले हे प्रदर्शन अाहे. ग्राहकांना बांधकाम व्यावसायिकांना जाेडणारा हा दुवा ठरेल. - सुनील काेतवाल, अध्यक्ष, क्रेडाई, नाशिक

ग्राहकांचा फायदा
येथे एकाचछताखाली विविध बांधकाम व्यावसायिकांचे प्रकल्प असून, ग्राहकांना एकाच छताखाली ते पाहायला िमळतात, तुलना करता येते घर खरेदीचा िनर्णय घेता येताे. या प्रदर्शनामुळे ग्राहकांचा फायदा हाेताे अाहे. - अनुप कटारिया, प्राेजेक्ट हेड, अशाेका रिअॅलिटी
प्रदर्शन ठरावे लाभदायी

मंदीच्याकाळातून अाज बांधकाम व्यवसायाला जावे लागत अाहे. यापूर्वी झालेल्या दाेन्ही प्राॅपर्टी एक्स्पाेला मी हाेताे, अाता त्यांचा अनुभव पाहता या प्रदर्शनातूनही चांगले व्यवहार हाेतील, अशी अपेक्षा अाहे. ‘दिव्य मराठी’ ग्राहक अाणि बांधकाम व्यावसायिक यांना या माध्यमातून जाेडते अाहे. - अशाेक मुर्तडक, महापाैर

‘दिव्य मराठी’ प्राॅपर्टी एक्स्पाेचे उद‌्घाटन करताना महापाैर अशाेक मुर्तडक, क्रेडाईचे अध्यक्ष सुनील काेतवाल, स्थायी समितीचे सभापती सलीम शेख, अशाेका रिअॅलिटीचे अनुप कटारिया अादी.
बातम्या आणखी आहेत...