आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वप्नातील घर अन् घरासाठी सर्व काही एकाच छताखाली, आजपासून‘दिव्य मराठी’च्या प्राॅपर्टी एक्स्पाे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - ‘दिव्य मराठी’तर्फे अायाेजित प्राॅपर्टी एक्स्पाे प्रदर्शनाचे उद््घाटन शुक्रवारी (दि. २४) सकाळी १०.४५ वाजता होत असून, श्री इच्छामणी लॉन्सवर पुढील तीन दिवस हे प्रदर्शन भरणार आहे. तुमच्या स्वप्नातील घर, घरासाठी अावश्यक असणारा िवत्त पुरवठा अाणि मनपसंत घर साकारण्यासाठी लागणाऱ्या विविध वस्तू एकाच छताखाली उपलब्ध हाेणार अाहेत. िनमित्त अाहे ‘दिव्य मराठी’तर्फे अायाेजित प्राॅपर्टी एक्स्पाे प्रदर्शनाचे. पहिल्यांदाच अशा प्रकारच्या प्रदर्शनांची संकल्पना ‘दिव्य मराठी’ने अाणली असून, शुक्रवार, शनिवार, रविवार असे तीन िदवस भरणाऱ्या प्रदर्शनात शहरातील गृहप्रकल्पांची, रिअल इस्टेटसंबंधी माहिती एकाच छताखाली िमळणार अाहे. अशाेका रिअॅलिटी प्रस्तुत रुंगटा ग्रुपच्या विशेष सहकार्यातून एक्स्पाे भरत अाहे.
मुंबई, पुणे, नाशिक हा सुवर्णत्रिकाेण मानला जाताे, नाशिकचा विकासाचा वेग पाहता येथे गुंतवणूक म्हणूनच नाही, तर सेकंड हाेम म्हणूनही गुंतवणुकीला वाव अाहे. झपाट्याने हाेणाऱ्या शहरीकरणात बांधकाम व्यावसायिकांकडून साकारले जात असलेले गृह व्यावसायिक प्रकल्प एक्स्पाेतून सादर केले जाणार अाहेत. शेतजमीन, प्लाॅट, बंगलाे, राे-हाउसेस, पेंट हाउसेस, शॉप्स, कमर्शियल स्पेस, अार्किटेक्चर्स, इंटेरियर डिझायनर्स, किचन ट्राॅलीज, वित्तीय संस्था, इलेक्ट्रिकल उपकरणे, फर्निचर्स यांसारख्या घरासाठी लागणाऱ्या गाेष्टीही येथे उपलब्ध असतील. ग्राहकांसह व्यावसायिकांसाठीही ही संधी आहे. एक्स्पोच्या उद््घाटन कार्यक्रमास महापौर अशोक मुर्तडक, आमदार बाळासाहेब सानप, क्रेडाई नाशिकचे अध्यक्ष सुनील कोतवाल, अशोका रिअॅलिटीचे अनुप कटारिया, रुंगटा ग्रुपचे निखिल रुंगटा, कारडा कन्स्ट्रक्शन्सचे नरेश कारडा, ‘दिव्य मराठी’चे निवासी संपादक जयप्रकाश पवार, महाव्यवस्थापक मदनसिंह परदेशी उपस्थित राहतील.
एक्स्पाेचे स्थळ वेळ
* २४, २५ अाणि २६ जून २०१६ * सकाळी - १० ते रात्री वाजेपर्यंत. * स्थळ : इच्छामणीलाॅन्स, उपनगर बस स्टाॅप, नाशिक-पुणे राेड, उपनगर, नाशिक-६.
एक्स्पोला यांचे सहकार्य
या एक्स्पाेसाठी फूड पार्टनर म्हणून मुंबई नाका भागातील ‘हॉटेल शबरी’चे, गिफ्ट पार्टनर म्हणून कॉलेजरोड येथील ‘दीप अप्लायन्सेस’चे सहकार्य लाभले आहे. तसेच, रेडिओ पार्टनर म्हणून रेडिओ विश्वासचे सहकार्य यासाठी लाभले आहे.
बातम्या आणखी आहेत...