आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाेरेगाव फिल्म सिटीच्या नफ्यातून 82 काेटीचा खर्च, गेल्यावर्षी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केलेली कागदपत्रे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - मुंढेगाव येथे चित्रनगरी उभारणे अव्यवहार्य असल्याचे सांस्कृतिकमंत्री विनाेद तावडे यांनी सांगितले. पण, याची व्यवहार्यता अाधीच तपासली गेली असल्याचे पुढे अाले अाहे. जागेचाही प्रश्न बऱ्याच अंशी निकाली निघालेला असून तेथे चित्रनगरी उभारण्यासाठी गाेरेगावच्या दादासाहेब फाळके चित्रनगरीच्या हाेणाऱ्या नफ्यातून ८२ काेटी रुपये खर्च करण्याची कागदपत्रेही जमा करण्यात अाल्याचे खासदार हेमंत गाेडसे यांनी सांगितले.
फाळकेंची भूमी असलेल्या नाशिकमध्ये चित्रनगरी उभी करावी असा प्रयत्न ९ वर्षांपासून सुरू अाहे.
 
 या संदर्भात मुंढेगावला ११७ एकर जमिनीची चर्चा देखील झालेली अाहे. शासनाला फक्त जमिनीचा प्रश्न हाताळायचा असून या संदर्भातील संपूर्ण बांधकामाचा खर्च गाेरेगाव फिल्मसिटीच्या नफ्यातून करण्यास महामंडळ तयार अाहे. त्यासाठी ७ जुलै २०१६ राेजी फिल्म सिटीचे तत्कालीन व्यवस्थापकीय संचालक शेखर चत्रे यांनी कागदत्रेही सादर केली यासंदर्भातील अहवाल गाेरेगाव फिल्म सिटीच्या संचालकपदी संजय पाटील असताना त्यांनी दिलेलाही अाहे. 
बातम्या आणखी आहेत...