आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हाॅटेल्समधील स्वच्छतागृहे महिलांसाठी हाेणार ‌‌खुली, ‘राइट टू पी’ चळवळीला लावणार हातभार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
नाशिक - कामानिमित्त घराबाहेर पडणाऱ्या महिलांना स्वतंत्र ठराविक अंतराने स्वच्छतागृहाची सुविधा देण्यात स्थानिक स्वराज्य संस्था अर्थातच महापालिका अपयशी ठरत असल्यामुळे मध्यंतरी राज्यभरात राबवल्या गेलेल्या ‘राईट टू पी’च्या चळवळीला हातभार लावण्यासाठी अाता हाॅटेल असाेसिएशनने पुढाकार घेतला अाहे. त्याचाच एक भाग म्हणून नाशिक शहरातील तारांकितपासून तर साध्या हाॅटेलपर्यंत सर्वांमार्फत महिलांना शाैचालय वापरण्याची माेफत सुविधा देण्याची याेजना लवकरच महापालिका राबवणार अाहे. त्या दृष्टीने इच्छुक हाॅटेलांशी करारनामा करण्यासाठी पालिकेचे प्रयत्न सुरू अाहेत. 
 
केवळ नाशिकच नव्हे तर राज्यभरात महिलांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहाचा मुद्दा अनेक वर्षांपासून गाजत अाहे. प्रामुख्याने, घरगुती कामाबराेबरच नोकरीनिमित्त अनेक महिला घराबाहेर पडतात. त्यांच्यासाठी वेगळे स्वच्छतागृह नसल्यामुळे मूत्रपिंडाशी संबंधित अाजारांचा सामना करावा लागताे. साधारण दाेन तासांच्या अंतराने महिला स्वच्छतागृहात गेल्यास त्यांच्या गर्भाशयावर ताण पडणे, तसेच मुतखडा, मासिक पाळीदरम्यान त्रास हाेत असल्याचे राष्ट्रीय आरोग्य संघटनेच्या सर्वेक्षणात पुढे अाले. स्वच्छतागृहाची सुविधा नसल्यामुळे महिलांकडून पाणी कमी पिण्यासारखे प्रकार घडत हाेते. त्यामुळे मध्यंतरी मुंबईत काही महिला संघटनांनी ‘राईट टू पी’ म्हणजेच महिलांना प्रसाधनगृहाचा अधिकार देण्याची चळवळ राबवली. 
 
दरम्यान, महापालिका क्षेत्रात १६ लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या असलेल्या नाशिक शहरात केवळ १०७ मुताऱ्या असून ३९५ सीट्स पुरुषांसाठी, तर १११ सीट‌्स महिलांसाठी आहेत. लोकसंख्येच्या प्रमाणानुसार ११ हजार लोकांमागे एक असे प्रमाण असले तरी, महापालिका त्या दृष्टीने सुविधा पुरवण्यात अपयशी ठरलेली हाेती. याव्यतिरिक्त साडेपाच हजार स्वच्छतागृहे असून त्यात १,८५६शौचालयांची देखभाल सुलभ तसेच पे अँड यूज तत्त्वावर होत आहे. मात्र, येथेही सुविधांची मारामार अाहे. महिलांसाठी सहाही विभागात स्वतंत्र स्वच्छतागृहासाठी प्रयत्न हाेत हाेते. मध्यंतरी खासगीकरणातून जाहिरात तत्त्वावरही स्वच्छतागृहासाठी चाचपणी झाली. दरम्यान, अाता विनाखर्च चांगल्या पद्धतीची स्वच्छतागृहाची सुविधा देण्यासाठी पालिकेने नामी शक्कल शाेधली अाहे. शहरात अनेक लहान-माेठी हाॅटेल्स असून येथे चांगल्या पद्धतीची स्वच्छतागृहे अाहेत. ही स्वच्छतागृहे अाता शहरातील महिलांना माेफत उपलब्ध करून देण्याचा विचार अाहे. त्यासाठी हाॅटेल्स असाेसिएशनसाेबत चर्चा झाली असून त्यांनी तत्वत: सहमती दिली अाहे. त्या दृष्टीने अाता हाॅटेल असाेसिएशनसाेबत चर्चा करून महापालिका या याेजनेत काेणते हाॅटेल्स सहभागी हाेऊ शकतील या दृष्टीने निर्णय घेणार असल्याचे शहर अभियंता यू. बी. पवार यांनी सांगितले.  
 
दिल्लीच्या धर्तीवर विशेष याेजना 
- सध्या महिलांना हाॅटेलचे स्वच्छतागृह वापरू दिले जाते; मात्र अाता दिल्लीच्या धर्तीवर सर्वच हाॅटेल्समध्ये ही सुविधा सामाजिक बांधिलकी म्हणून उपलब्ध करून देण्याचा विचार अाहे. पालिकेशी चर्चा करून लवकरच याेजना अंतिम हाेईल.
-संजय चव्हाण, अध्यक्ष, अाहार संघटना 
 
महिलांची गैरसाेय दूर हाेणार 
- महापालिकेमार्फत महिलांसाठी स्वच्छता गृहे बांधली जात अाहेत; मात्र सध्या हाॅटेल्समधील स्वच्छतागृहे महिलांना माेफत उपलब्ध करून दिली जातील. हाॅटेल्सची संख्या माेठी असून ठिकठिकाणी असल्यामुळे महिलांची गैरसाेय दूर हाेईल. शिवाय, पालिकेचा काेणताही खर्च हाेणार नाही.
-रंजना भानसी, महापाैर 
बातम्या आणखी आहेत...