आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिक : दारू दुकानावर मतदान, 25 टक्के रहिवाशांचा हवा प्रस्ताव

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो - Divya Marathi
फाइल फोटो
नाशिक - दारू दुकान स्थलांतरणाच्या निर्णयासाठी मतदानाची प्रक्रिया राबविण्याचे अादेश देण्यात आले, परंतु अशी प्रक्रिया राबविण्यासाठी स्थानिक रहिवाशांपैकी २५ टक्के नागरिकांनी यासाठी मतदान घ्यावे, असा प्रस्ताव देणे अनिवार्य आहे. त्यानंतरच मतदान प्रक्रिया राबविण्यात येईल, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितल्याने आता दारू दुकानबंदीसाठी स्थानिकांची मतदानापूर्वीच धावपळ होण्याची शक्यता आहे. 
 
न्यायालयाच्या आदेशानंतर बंद झालेल्या दारू दुकानावरुन नाशिकमध्ये निर्माण झालेला वाद राज्याच्या उत्पादन शुल्क मंत्र्यांच्या दालनात जाऊन पोहचला. प्रभाग क्रमांक २३ मधील संत चार्वाक चौकातील अमर वाइन आणि प्रभाग ३० मधील टागोर नगरमधील महारानी वाइन ही दोन्ही दुकाने सुरू ठेवण्याबाबत कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचनादिल्या. कायद्यात मतदानाची तरतूद असल्याने ही प्रक्रिया त्वरीत राबविण्याचेही त्यांनी आदेश दिले. त्यानुसार प्रशासकीय यंत्रणेने कार्यवाही सुरू केली आहे. परंतु हे दुकान सुरू किंवा बंद करण्यासाठी मतदान प्रक्रिया राबवायची असली तरीही त्या वाॅर्डातील मतदारांपैकी तब्बल २५ टक्के मतदारांच्या संमतीचा प्रस्ताव प्रथम जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर करणे अनिवार्य आहे. त्यांचा प्रस्ताव आल्यानंतर संबधित यंत्रणेकडून त्यावरील मतदारांची शहानिशा केली जाईल. त्याची तपासणी पूर्ण झाल्यानंतर निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करत मतदान दिन निश्चित केला जाईल. त्यामुळे आता दुकान बंद करावयाचे असेल तर त्यासाठी वाॅर्डातील मतदारांची मनधरणी करण्याची वेळ या नागरिकांवर येणार आहे. तर दुकानदाराकडूनही आता ‘फिल्डिंग लागण्याची शक्यता असल्याने खऱ्या अर्थाने ही ‘निवडणूक’ चांगलीच रंगतदार होण्याचीही शक्यताही नाकारता येत नाही. 
 
दारू दुकान बंदीसाठी हवे ५० टक्क्यांपेक्षा अधिक मतदान 
मतदान घेतल्यास निश्चित केलेल्या एकूण मतदारांपैकी ५० टक्क्यांपेक्षा अधिक मतदान होणे बंधनकारक आहे. त्यानुसार दुकान बंद अथवा सुरू ठेवण्याचा निर्णय घेता येईल. 
 
प्रक्रियेसाठी महिला की एकूण मतदार, नागरिकांचा निर्णय 
या प्रक्रियेसाठी महिला मतदारांचीच निवडणूक घ्यायची की संपूर्ण मतदारांची अर्थात महिला पुरुष अशा दोन्ही मतदारांचे मतदान घ्यायचे, हा निर्णय स्थानिक नागरिकांचाच राहाणार आहे. त्यानुसार मतदान प्रक्रिया राबवली जाणार असल्याचे प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आले. 
 
मतदानासाठी वाॅर्ड की प्रभाग, यंत्रणाही संभ्रमात 
दारू दुकानावर निर्णयासाठी घेण्यात येणऱ्या मतदानासाठी कायद्यात वाॅर्डाची तरतूद आहे. पण सध्या महापालिका हद्दीत वाॅर्ड नसून प्रभाग आहेत. त्यामुळे आता मतदानासाठी नेमकी हद्द कुठली निश्चित करावयाची ? अस्तित्वातील प्रभागात मतदान घेतल्यास ती हद्द खूप मोठी होईल. तर कायद्यात वाॅर्ड असा उल्लेख असल्याने जुन्या वाॅर्डानुसार मतदान घ्यावे लागल्यास काय करावे, असे प्रश्न यंत्रणेच्या समोर उभे ठाकले आहेत. 
 
पुढील स्लाइडवर वाचा, कायदेशीर मार्गदर्शन घेऊ... 
बातम्या आणखी आहेत...