आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘दिव्य मराठी’ उत्सव: भावना, संवेदना.. अासू अन‌् हसू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - माझा जन्मच माझी कविता अाहे.. किंवा माझी कविताच माझा जन्म अाहे.. नव्हे नव्हे प्रत्येक अाठवण माझी कविता अाहे.. प्रत्येक कविताच माझी अाठवण अाहे.. हेदेखील नव्हे तर प्रत्येक अनुभव म्हणजे ‘मी माझा अाणि मी’ अाहे तर ‘मी माझा अाणि मी’ हा माझाच नव्हे, तर थाेड्याफार फरकाने प्रत्येकाचाच अनुभव अाहे... मग ताे कधी भावनांच्या कल्लाेळात हरवलेला, कधी संवेदनांमध्ये अडकलेला, कधी वास्तवाचं भान अाणणारा, तर कधी चाैकटीबद्ध जगण्याचा विट देऊन जाणारा अाहे.. पण करणार काय? अायुष्य हे असंच अाहे अाणि म्हणूनच ‘मी माझा अाणि मी’ अाहे.. तसेच तुम्हीही अाहात.. असं अापल्या चार-चार अाेळींतून जगण्याचं भान अाणि अापल्या भाेवतीचं विश्व किती पाेकळ अाहे, त्यात अापण किती गुंतलाे अाहाेत, याचे चिमटे घेत.. नातं जपलंच पाहिजे, अशी विनंती करत लेखक, कवी चंद्रशेखर गाेखले यांनी नाशिककरांना खुर्चीत खिळवून ठेवलं...

‘दिव्य मराठी’च्या चाैथ्या वर्धापन दिनानिमित्त चंगाेंच्या ‘मी माझा अाणि मी’ या कुसुमाग्रज स्मारकात झालेल्या कार्यक्रमाला नाशिककरांनी उदंड प्रतिसाद दिला अाणि चंगाेंच्या चाराेळ्यांमध्ये उपस्थित प्रत्येकजण हरखून गेला. चंद्रशेखर गाेखले यांचे स्वागत कुसुमाग्रज प्रतिष्ठानचे कार्यवाह लाेकेश शेवडे यांनी केले, तर त्यांचा सत्कार ‘दिव्य मराठी’चे जनरल मॅनेजर मदनसिंह परदेशी यांच्या हस्ते करण्यात अाला. तसेच शेवडे यांचे स्वागत अाणि सत्कार ‘दिव्य मराठी’चे निवासी संपादक जयप्रकाश पवार यांच्या हस्ते करण्यात अाला. कार्यक्रमाला नाशिकमधील ज्येष्ठ कवींसह तरुण कवीही अावर्जून उपस्थित हाेते.


माणूस नावाच्या इरसाल प्राण्याच्या स्वभावाच्या गंमती, त्याच्या वागण्यातील तऱ्हेवाइकपणा, ढाेंगीपणा, जगण्यातले विराेधाभास वेगवेगळ्या उदाहरणांतून ‘चंगाे’ सांगत हाेते. ते एेकताना श्राेत्यांतून हास्याचा खळखळाट वाहत हाेता.

नाशिक सुखाचं घर!
नाशिकखूप सुंदर अाहे, मला नाशिकचा मोह वाटतो. नाशिक हे सुखाचं घर असून, येथील माणसंही चांगली आहेत, असे सांगत चंगाेंनी नाशिककरांचे अाभार मानतानाच सगळ्यांना अापलेसे करून घेतले.

या कार्यक्रमामध्ये ‘चंगाे’ यांनी सादर केलेल्या कविता, चाराेळ्या अाणि नानाविध अाठवणी किश्श्यांना रसिकांनी भरभरून दाद दिली. या कवितांनी कधी अंतर्मुख केले, तर कधी रडवले. अनेकदा रसिक या साध्या कवितांतील खाेल भावनांच्या दर्शनाने अचंबित झाले.
‘दिव्य मराठी’ उत्सवातील ‘मी माझा अाणि मी’ या कार्यक्रमानंतर रसिकांनी लेखक कवी चंद्रशेखर गाेखले यांना गराडा घालत एक अविस्मरणीय काव्यानुभव दिल्याबद्दल धन्यवाद दिले.

अायुष्याची गंमत सांगत केले अंतर्मुख...
कविताअन् चारोळ्यांनी रसिकांना पोट धरून हसायला लावतानाच चंद्रशेखर गाेखले यांनी गमतीदार अनुभव सांगत सर्वांनाच आत्मपरीक्षण करायला लावले. देवघरातील पूजा करताना पूजा करून टाकली, पूजा उरकली, असे शब्दप्रयोग ऐकावयास मिळतात. तसेच देवांना कुकरमध्ये टाकून, तसेच ब्रशने स्वच्छ करण्याच्या किश्श्यांनी तर रसिक पोट धरून हसले.
बातम्या आणखी आहेत...