आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विकास मंच अभियान रविवारी इंदिरानगरमध्ये; समस्या मांडण्याची संधी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- नाशिककरांना आपल्या प्रभागातील नागरी समस्या महापालिकेचे अधिकारी व नगरसेवक यांच्यासमोर मांडण्यासाठी ‘दिव्य मराठी’ने ‘विकास मंच अभियान’च्या माध्यमातून प्रभावी व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहे. त्या अंतर्गत महापालिकेच्या पूर्व विभागातील इंदिरानगर येथील प्रभाग क्रमांक 40 मध्ये रविवारी (दि. 8 ) सकाळी 10 वाजता अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे.
‘तुमचे प्रश्न, तुमचा आवाज : शहराचा विकास’ हे या अभियानाचे ब्रीदवाक्य आहे. नागरिकांना भेडसावणार्‍या समस्या मार्गी लावण्यासाठी या अभियानाची मदत होत आहे. प्रभाग क्रमांक 61 व 1 नंतर आता हे अभियान रविवारी पूर्व विभागातील प्रभाग क्रमांक 40 मध्ये होणार असून, परिसरातील रहिवाशांना समस्या व तक्रारी मांडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
रथचक्र परिसरातील अजय मित्रमंडळाच्या हॉलमध्ये कार्यक्रम होईल. नगरसेविका डॉ. दीपाली कुलकर्णी व नगरसेवक यशवंत निकुळे यांच्यासह महापालिका अधिकारी नागरिकांच्या प्रश्नांना उत्तरे देणार आहेत. माहितीसाठी 7507773925 या क्रमांकावर सकाळी 11 ते 5 या वेळेत संपर्क साधावा. नागरिकांनी समस्या, प्रश्न मांडावेत, असे आवाहन ‘दिव्य मराठी’तर्फे करण्यात आले आहे.