आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रभाग 44 मधील गाळे बचत गटांना देणार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - प्रभाग क्रमांक 44 मधील राजे संभाजी स्टेडियमजवळील रिकामे गाळे बचत गटांतील महिलांना कमी दरात देण्यात येतील, अशी महत्त्वपूर्ण घोषणा प्रभाग 44 चे नगरसेवक लक्ष्मण जायभावे व शीतल भामरे यांनी ‘दिव्य मराठी विकास मंच’ अभियानात केली.

‘दिव्य मराठी’च्या वतीने अश्विननगर येथील मानवसेवा केंद्राच्या सभागृहात (मायको हॉल) ‘विकास मंच’ अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास परिसरातील नगरसेवकांसह अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक शांताराम अवसरे उपस्थित होते. नागरिकांच्या प्रश्नांना उत्तर देताना नगरसेवक लक्ष्मण जायभावे यांनी सांगितले की, राजे संभाजी स्टेडियमवरील अडीच वर्षांपासून बंद असलेले 18 गाळे महिला बचत गटांना रोजगार संधी मिळावी यासाठी कमी भाडेतत्त्वावर दिले जातील. हे गाळे महिला बचत गटांना मिळावे यासाठी पाठपुरावा करू, असे नगरसेविका शीतल भामरे यांनी सांगितले.

महिलांसाठी जिम
राजे संभाजी स्टेडियम परिसरात महिलांना व्यायाम करण्यासाठी आमदार नितीन भोसले यांच्या निधीतून ओपन जिम येत्या आठ दिवसांत सुरू करण्यात येणार आहे. शीतल भामरे, नगरसेविका

महिलांसाठी मार्केट
सिडकोत महिलांसाठी स्वतंत्र मार्केट तयार करण्याचा प्रस्ताव आम्ही गेल्या पंचवार्षिकमध्ये महासभेत मंजूर केला असून, त्याचे काम लवकरच सुरू होणार आहे. लक्ष्मण जायभावे, नगरसेवक