आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वच्छतागृहे, गतिरोधकांचा अभाव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - महात्मानगर, सर्मथनगर, पारिजातनगर, विकास कॉलनी, मॉडेल कॉलनी, रामनगर, लव्हाटेनगर, उत्कर्षनगर, सिद्धार्थनगर, कृषीनगर, कॉलेजरोडचा काही भाग (एचपीटी कॉलेज ते भोसलापर्यंतचा परिसर), कल्पनानगर, सहजीवन कॉलनी या भागांचा समावेश असलेल्या प्रभाग क्रमांक 22 मध्ये रविवारी सकाळी 10 वाजता अभियान घेण्यात आले. ‘विकास मंच’चे व्यासपीठ म्हणजे प्रश्न मांडण्याची सुवर्णसंधी आहे, ही बाब जाणल्याने रविवार असूनही परिसरातील नागरिकांनी महात्मानगरमधील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सभागृहात सकाळपासूनच गर्दी केली होती. अगदी शिस्तबद्ध पद्धतीने प्रश्न लिहून देत त्यावर साधकबाधक चर्चा करण्यात आली. काही प्रश्नांच्या उत्तरांनी समाधान न झाल्याने काही नागरिकांनी आपल्या शैलीत नाराजीही व्यक्त केली. परंतु, संबंधित नगरसेवकांनी या नाराजीमागील भावना लक्षात घेऊन संबंधितांच्या भागात भेट देण्याचा शब्द दिला. त्यामुळे नागरिकांची नाराजी दूर झाली. या संपूर्ण अभियानाचा हा लेखाजोखा..

नागरिकांनी मांडलेल्या समस्या
जागा मिळावी
डिसूझा कॉलनीतील टेनिस कोर्टची जागा स्थानिकांना मिळावी. परिसरातील कालवा रद्द झाल्याने त्या जागेचा वापर रस्ता म्हणून करण्यासाठी प्रयत्न करावेत. - रेखा नाडगौडा

पथदीप दुरुस्त व्हावेत
गो. ह. देशपांडे उद्यानातील झाडांच्या फांद्या पथदीपांपर्यंत पोहोचल्याने त्या तोडणे आवश्यक आहे. पथदीप व पेव्हर ब्लॉकची दुरुस्ती करावी. - अरविंद भंदुरे

स्वच्छतागृहे व्हावीत
परिसरात महिला व पुरुषांकरिता स्वच्छतागृहे नाहीत. राधिका हॉटेलजवळील चौकात नेहमीच अपघात होतात. पथदीप बंद असल्याने, झाडांच्या फांद्यामुळे पुरेसा प्रकाश पडत नाही. - रवींद्र वडनेरे

रस्ते दुरुस्त करावेत
परिसररातील रस्त्यांची व पथदीपांची दुरवस्था दूर करावी. पारिजातनगर चौफुलीवर सर्कल व्हावे. - रमेश कडलग

योग्य नियोजन व्हावे
कृषीनगर ते बारा बंगला शुद्धीकरण केंद्रापर्यंतचा रस्ता कॉलेजरोडला पर्यायी रस्ता ठरू शकेल. त्याचे नियोजन व्हावे. -अजित जाधव

बंद पथदीपांमुळे गैरसोय
वेळोवेळी सांगूनही गतिरोधक टाकले जात नाहीत. पथदीप नेहमीच बंद स्थितीत असतात. आम्हाला फक्त आश्वासने नकोत, तर प्रत्यक्षात कृती होण्याची अपेक्षा आहे. - डॉ. जे. के. पूरकर

अवैध पार्किंगचा त्रास
इंदिरा गांधी व्यापारी संकुलात संरक्षक भिंत बांधावी. इतर इमारतींमधील कर्मचार्‍यांचे अवैध पार्किंग थांबवावे. रात्रीच्या वेळी होणारा प्रेमीयुगुलांचा वावर थांबवावा. परिसरात मुलांसाठी चांगले उद्यान अथवा मैदान उपलब्ध होणे गरजेचे आहे. - महेश मोरे