आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एबीबी सर्कल ते सिटी सेंटर रस्त्याचे होणार चौपदरीकरण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - एबीबी सर्कल ते सिटी सेंटर मॉलदरम्यानच्या रस्त्याचे चौपदरीकरण येत्या महिन्यात सुरू होणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा प्रभाग क्रमांक 22 चे नगरसेवक शिवाजी गांगुर्डे व छाया ठाकरे यांनी केली. या कामासाठी आठ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचेही ते म्हणाले. ‘दिव्य मराठी’च्या वतीने आयोजित ‘विकास मंच’ अभियानात ते बोलत होते.

प्रभाग क्रमांक 22 मधील विविध नागरी समस्यांवर चर्चा करण्यासाठी महात्मानगर येथील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सभागृहात ‘दिव्य मराठी’च्या वतीने ‘विकास मंच’ अभियानाचे रविवारी आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात परिसरातील बहुसंख्य नागरिकांनी सहभाग घेऊन आपली विविध गार्‍हाणी मांडली. सिटी सेंटर मॉलबाहेर रस्त्यावर वाहने उभी केली जात असल्याने वाहतुकीचा खोळंबा होत असल्याच्या तक्रारी या वेळी नागरिकांनी केल्या. याबाबत वाहतूक विभागाशी चर्चा करून रस्त्यावर वाहने उभी राहणार नाहीत, अशी उपाययोजना करण्याची ग्वाही नगरसेवकांनी दिली. तसेच, रिंगरोडअंतर्गत एबीबी सर्कल ते सिटी सेंटर मॉलदरम्यानच्या रस्त्याच्या चौपदरीकरणाचे काम महिनाभरात सुरू करण्यात येईल, असेही नगरसेवकांनी सांगितले.