आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

साडेपाच एकरांवर साकारणार क्रीडांगण

7 वर्षांपूर्वी
 • कॉपी लिंक
नाशिक - जेलरोड परिसरातील दुर्गामाता मंदिर देवस्थान ट्रस्टच्या आवारात ‘दिव्य मराठी’तर्फे आयोजित ‘विकास मंच’ अभियानात प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांसह महिला व तरुणांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत हजेरी लावली. या व्यासपीठाच्या माध्यमातून नागरिकांनी सार्वजनिक जीवनात भेडसावणार्‍या समस्यांबाबत विचारणा करीत महत्त्वाच्या उपाययोजनाही सुचविल्या.

प्रभागातील दोन्हीही लोकप्रतिनिधींनी नागरिकांच्या समस्या जाणून घेत त्या तातडीने सोडविण्याचे आश्वासन दिले. रस्ते, पाणी, दिवाबत्ती, आरोग्य या सुविधा पुरविण्याची जबाबदारी महापालिकेची असल्याने पुढील वर्षभरात नागरिकांचे सर्व प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. सार्वजनिक ठिकाणी स्वच्छता राखली तर आरोग्य अबाधित राहील, त्यासाठी महिला व नागरिकांनी सहकार्य केले पाहिजे, अशी अपेक्षा लोकप्रतिनिधींनी व्यक्त केली. लोकसहभागातून प्रभागाचा सर्वांगीण विकास करण्यात येईल, असा विश्वासही त्यांनी या वेळी व्यक्त केला. या वेळी कुलदीप आढाव उपस्थित होते. प्रारंभी ‘दिव्य मराठी’चे वृत्तसंपादक प्रताप जाधव यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.

हेमराज चौधरी यांनी आभार मानले.
 • नारायणबापूनगर ते सैलानीबाबापर्यंतच्या धोकेदायक वीजतारा लवकरच भूमिगत करण्यात येतील.
 • सिद्धेश्वरनगर परिसरात प्रभागातील ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा सदन व वाचनालय उभारण्यात येणार आहे.
 • दसक ते प्रकाश- आनंदनगर या रस्त्याचे काम पुढील वर्षभरात पूर्णत्वास नेण्यात येईल. यासाठी 18 मीटर रस्त्यासाठी 79 लाख रुपयांचा खर्च प्रस्तावित आहे.
 • जेलरोड भागात गेल्या अनेक वर्षांपासून भेडसावणारी पाण्याची समस्या आता कायमची मिटणार असून, पुढील काही दिवसांत दुर्गामाता जलकुंभाचे लोकार्पण करण्यात येईल.
 • नारायणबापूनगरातील वर्दळीच्या चौकात महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सीसीटीव्ही बसविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील.
 • पुष्पकनगर व पारिजातनगर परिसरात महिलांसाठी आधुनिक व्यायामशाळा उभारण्यात येत असून, लवकरच हे काम पूर्ण होणार आहे.
 • सिद्धेश्वरनगर परिसरातील साडेपाच एकर जागेवर सर्व सुविधा असलेले आधुनिक क्रीडांगण उभारण्यात येईल.
 • जय अंबे कॉलनी व नीलमणी उद्यानाचे काम मंजूर झाले असून, लवकरच ते पूर्णत्वास जाईल.
 • पारिजातनगरमधील रस्त्यांची प्रलंबित असलेली कामे तातडीने पूर्ण केली जातील.
 • पिंटू कॉलनीतील नादुरुस्त चेंबर व ड्रेनेजचे काम लवकरच पूर्णत्वास नेण्यात येईल.
 • धनराज कॉर्नर्स प्रभागातील वर्दळीच्या चौकांत गतिरोधक बसविण्यासाठी संबंधित विभागांकडे पाठपुरावा केला जाईल.
पूर्ण झालेली विकासकामे व खर्च
 • गोदावरी सोसायटी येथे 20 लक्ष लिटर क्षमतेचा जलकुंभ उभारण्यात आला : एक कोटी 24 लाख रुपये
 • दसक गावठाणात काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण : 14 लाख 78 हजार रुपये
 • टाकळी गाव येथील 30 मीटर डीपी रस्त्याचे डांबरीकरण व शिवरामनगर, वैशालीनगर येथे
 • खडीकरण : एक कोटी 19 लाख 16 हजार रुपये
 • शिवरामनगर व सिद्धेश्वरनगर परिसरातील रस्ते रुंदीकरण व डांबरीकरण, पेव्हरब्लॉक बसविण्यात आले : तीन कोटी 10 लाख 93 हजार रुपये
 • चंपानगरी व सप्तशृंगीनगरातील रस्ते रुंदीकरण व डांबरीकरणासह सुशोभीकरण : एक कोटी 16 लाख 45 हजार रुपये
 • कॅनॉलरोड ते नारायणबापू चौकापर्यंतच्या 12 मीटर डीपीरोडचे डांबरीकरण व सुशोभीकरण: दोन कोटी 20 लाख 35 हजार रुपये
 • गावठाणात पाण्याच्या नवीन जलवाहिन्या टाकण्याचे काम पूर्ण
 • महालक्ष्मीनगरमध्ये खडीकरण व डांबरीकरण
 • पार्वताबाईनगरमध्ये नागरिकांसाठी सभामंडप
 • ओमनगर, वैशालीनगर, पार्वताबाईनगरात पथदीप प्रस्तावित विकासकामे
 • प्रभागात विविध ठिकाणी माहितीफलक व सूचनाफलक बसविणे : एक लाख 99 हजार रुपये
 • नारायणबापू चौक ते दसक-टाकळी शिवपर्यंतचा रस्ता रुंदीकरण व डांबरीकरण : तीन कोटी 31 लाख 91 हजार रुपये
 • पार्वताबाईनगर येथील खुल्या जागेवर सभामंडप बांधणे : 10 लाख 72 हजार रुपये
 • मंगलमूर्तीनगर परिसरात सभागृह बांधणे : 28 लाख 15 हजार रुपये
 • दसक शिवारात महिलांसाठी व्यायामशाळा तयार करणे : 23 लाख 51 हजार रुपये
 • पुष्पकनगर येथे महिलांकरिता व्यायामशाळा बांधणे : 39 लाख 55 हजार रुपये
 • श्रीरामनगर, पुष्पकनगर, तलाठी कॉलनी, चैतन्यनगर येथील उद्यानांत खेळणी बसविणे : 9 लाख 97 हजार रुपये.