आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘दिव्य मराठी’चा रक्तसंकलन जागर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - ‘दिव्य मराठी’, इंड‍ियन मेडिकल असाेसिएशन (आय.एम.ए.), जीवन रक्तपेढी आणि डाॅ. वसंतराव पवार मेडिकल काॅलेज यांच्या संयुक्त विद्यमाने १२ ते १९ एप्रिलदरम्यान ‘रक्तदान अभियान’ आयोजित करण्यात आले आहे.
उन्हाळयात रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा असताे. यावर मात करण्यासाठी हे अभियान याेजले आहे. तरुण मित्र मंडळे, गणेशाेत्सव मंडळे, स्वयंसेवी संस्था, उद्याेग व्यावसायिक आस्थापना यांना या अभियानात सहभागी हाेता येणार आहे. उन्हाळ्यात माेठ्या प्रमाणावर प्रवास हाेत असल्याने अपघातांचे प्रमाण वाढते रक्ताची मागणी जास्त असते. मागणी पुरवठ्यातील ही तफावत भरून काढण्यासाठी रक्तपेढ्यांना कसरत करावी लागते. यासाठी स्वेच्छेने रक्तदानास पुढे यावे, असे आवाहन या उपक्रमातून शहरवासीयांना करण्यात येत आहे.

या उपक्रमाशिवाय ‘रेस अॅक्रास अमेरिका’ या जगातील सर्वात कठीण सायकलिंग स्पर्धेत यावर्षी पात्र ठरलेल्या डाॅ. महाजन बंधूंना पाठिंबा देण्यासाठी अंधांना दृष्टी देण्याच्या कार्यासाठी निधी संकलन करण्याच्या उद्देशाने हे अभियान याेजले आहे. आजपर्यंत ही स्पर्धा एकही भारतीय पूर्ण करू शकले नाही. महाजन बंधू यात यशस्वी झाल्यास देशासाठी ते अभिमानास्पद असेल. यात संकलित होणा-या प्रत्येक रक्तपिशवीमागे १५० रुपये महाजन बंधू दृष्टिदानासाठी कल्पतरू फाउंडेशनला देणगी स्वरूपात दिले जातील. या अभियानात रक्तदान करून रक्तदाता तीन रुग्णांचे प्राण वाचवण्यात मदत करेल, अंधांना दृष्टिदान देण्यात सहकार्य करेल देशासाठी गौरवास्पद कार्यात आपला सहभाग नोंदवणार आहे.

या उपक्रमात सहभागी व्हा
याउपक्रमांतर्गत १२ ते १९ एप्रिलदरम्यान रक्तदान शिबिर संयोजन करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी डाॅ. राजेश कुचेरिया - ९८२३०२५२९२, जीवन रक्तपेढी - ९६०४४९६०४४ या भ्रमणध्वनी क्रमांकांवर संपर्क साधावा.