आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Divya Marathi's Special Report Today Present In High Court

‘दिव्य मराठी’चा ‘स्पेशल रिपोर्ट’ आज उच्च न्यायालयात

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - गोदावरी प्रदूषणाची तीव्रता फारशी नसल्याचा दावा करणार्‍या महापालिकेचे पितळ उघडे पाडण्यासाठी गोदावरी गटारीकरणविरोधी मंच बुधवारी उच्च न्यायालयासमोर ‘दिव्य मराठी’ने गोदा प्रदूषणाबाबत प्रसिद्ध केलेल्या स्पेशल रिपोर्टची कात्रणे सादर करणार आहे. याबरोबरच, न्यायालयाच्या सूचनांची कशी अंमलबजावणी झाली नाही, याबाबतही युक्तिवाद करणार आहे.


सिंहस्थ कुंभमेळा तोंडावर आला असतानाही गोदावरी प्रदूषणमुक्त करण्यात पालिकेला यश आलेले नाही. शहरातील सांडपाणी गोदावरीत मिसळत असल्यामुळे एखाद्या नाल्याप्रमाणे या पवित्र नदीची अवस्था झाली असल्याच्या स्थितीवर ‘दिव्य मराठी’ने प्रकाशझोत टाकला होता. याच मुद्यावरून गोदावरी गटारीकरणविरोधी मंच उच्च न्यायालयात गेला असून, बुधवारी त्यावर सुनावणी आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ व महापालिकेने गोदावरी प्रदूषण कमी करण्यासाठी प्रतिज्ञापत्र सादर केले असून, त्यात केलेल्या उपाययोजनांमधील त्रुटीही मंचाकडून निदर्शनास आणून दिल्या जाणार आहेत.


प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नमुनेही सादर : प्रदूषण नियंत्रण मंडळाने मार्चमध्येच गोदावरीचे विविध पाणी नमुने तपासणीसाठी घेतले असून, त्याचाही अहवाल न्यायालयासमोर सादर केला जाणार आहे.
गोदा प्रदूषणाची सत्यता समजेल

गोदावरी प्रदूषणाबाबत याचिका दाखल केल्यानंतर महापालिकेने छायाचित्रणाच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गोदावरी स्वच्छ असल्याचे न्यायालयात दाखवले. मात्र, न्यायालयाने प्रदूषण नियंत्रण मंडळामार्फत गोदावरीच्या नमुन्यांची पुन्हा तपासणी करण्याचे आदेश दिले. दरम्यान, ‘दिव्य मराठी’ने गोदावरी प्रदूषणावर स्पेशल रिपोर्ट केला. त्यामुळे आता या रिपोर्टसह सर्व कागदपत्रे न्यायालयासमोर सादर करून लवकरात लवकर गोदावरी स्वच्छ कशी करता येईल, यावर बाजू मांडली जाईल. राजेश पंडित, याचिकाकर्ते, गोदावरी गटारीकरणविरोधी मंच