आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनसाेक्त विहाराने पक्ष्यांसाठी ‘हॅपी संक्रांत’; 'दिव्‍य मराठी’च्या नायलाॅन मांजामुक्त संक्रांत अभियानास नाशिककरांचा भरभरून प्रतिसाद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - जीवघेण्या नायलाॅन मांजाच्या विराेधात ‘दिव्य मराठी’ने दाेन महिन्यांपासून घडवून अाणलेली जनजागृती, त्याला प्रतिसाद देत महापालिका अाणि खासगी शाळांमध्ये घेण्यात अालेल्या शपथ, हरित लवादासह उच्च न्यायालय अाणि सर्वाेच्च न्यायालयाने विक्री, वापराला घातलेली बंदी, पाेलिसांनी केलेली कारवाई अाणि नाशिककरांनीही समजदारीची भूमिका घेत नायलाॅनमुक्त संक्रांतीचा केलेला संकल्प या सर्वांची परिणिती म्हणून यंदाच्या संक्रांतीच्या दिवशी (दि. १४) एकाही जखमी पक्ष्याला पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचारासाठी दाखल करण्यात अाले नाही. दुसरीकडे जिल्हा रुग्णालयातही नायलाॅन मांजामुळे जखमी झालेले रुग्ण दाखल झाले नाहीत. 

काही वर्षांपासून नायलाॅन मांजाने असंख्य नाशिककरांचे नाक, कान, गळे, गाल जखमी केले हाेते. तसेच, पक्षीही माेठ्या प्रमाणात जखमी झाले हाेते. हा मांजा बळकट अाणि धारदार असल्याने त्याच्यापासून हाेणाऱ्या जखमांचे परिणाम गंभीर असतात. या पार्श्वभूमीवर गेल्या चार वर्षांपासून ‘दिव्य मराठी’ने नायलाॅन मांजाविराेधात स्वतंत्र माेहीमच राबविण्यात येत अाहे. त्यात नायलाॅनच्या मांजाच्या दुष्परिणामाविषयी व्यापक स्वरूपात चर्वितचर्वण करण्यात अाले. काही दुकानांत नायलाॅनची विक्री हाेत असल्याची बाब लक्षात अाल्यावर ‘डी. बी. स्टार’ चमूने काही दुकानांमधून ताे मिळवत संबंधितांचे पितळ उघडे केले. नायलाॅन मांजामुळे गंभीर जखमी झालेल्यांचीही माहिती ‘दिव्य मराठी’त विस्तृत स्वरूपात प्रसिद्ध करण्यात अाली. दुसरीकडे जिल्हा प्रशासनासह पाेलिस प्रशासनानेही या अभियानाला साथ देत मांजाविक्रेत्यांवर छापे टाकले. त्यात शेकडाे किलाे मांजा जप्त करून नष्ट करण्यात अाला. 
 
शिवाय, अनेकांनी मांजाची खरेदी केल्यानंतरही ताे वापरण्याचा पवित्रा घेतला. महापालिकेच्या खासगी शाळांमध्ये नायलाॅन मांजाविरहित संक्रांतीची शपथ घेण्यात अाली. अनेक सामाजिक संस्थांनी वेगवेगळ्या उपक्रमांद्वारे नायलाॅनमुक्तीला बळकटी दिली. पाेलिस अायुक्त कार्यालयाच्या सहकार्याने शहरातील सर्व चित्रपटगृहांत नायलाॅन मांजाविराेधातील चित्रफिती दाखविण्यात अाल्या. या सर्वांचा परिपाक म्हणजे यंदा नायलाॅन मांजाचा वापर कमालीचा घटल्याचे चित्र हाेते. जीवघेण्या नायलाॅन मांजाला बहुतांश पतंगप्रेमींनी गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही नाकारल्याने पक्ष्यांना अाकाशात मनसाेक्तपणे विहार करता अाला. 

दाेन वर्षांपूर्वी पशुवैद्यकीय दवाखान्यात जखमी ३० पक्ष्यांवर, तर गेल्यावर्षी पक्ष्यांवर उपचार करण्यात अाले हाेते. यंदाच्या संक्रांतीला मात्र एकाही पक्ष्याला दाखल केल्याने ‘दिव्य मराठी’च्या नायलाॅन मांजामुक्त संक्रांत अभियानाला माेठे यश लाभल्याचे स्पष्ट झाले अाहे. नाशिकमधील पक्षीमित्रांनीही यास दुजाेरा दिला अाहे. बहुतांश पतंगप्रेमींनी नायलाॅनवर फुली मारून सुती मांजाचा वापर करण्यास पसंती दर्शविली. 

पतंग उडविताना बालगाेपाळांचा उत्साह अाेसंडून वाहत हाेता. 
संक्रांतीच्या दिवशी नायलाॅनचा मांजात अडकून पक्षी जखमी हाेत असल्याचा शहराचा अनुभव हाेता. अनेक पक्ष्यांचा नायलाॅनचा फास लागून मृत्यूही झाल्याच्या घटना हाेत हाेत्या. अशाेकस्तंभ येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात तीन वर्षांपूर्वी संक्रांतीला सुमारे ४५ पक्षी उपचारासाठी दाखल झाले हाेते. दाेन वर्षांपूर्वी ३०, तर गेल्या वर्षी केवळ पक्षी उपचारासाठी दाखल केले हाेते. यंदा मात्र एकाही पक्ष्याला उपचारासाठी दाखल करण्यात अाले नाही. अर्थात काही ठिकाणी पक्षी जखमी झाले. त्यांच्यावर पक्षीमित्रांनी उपचार केले. 

पक्षी दाखल हाेण्याची पहिलीच संक्रांत 
संक्रांतीला एकही पक्षी उपचारासाठी दाखल हाेण्याची ही पहिली वेळ अाहे. ‘दिव्य मराठी’चे अभियान अाणि प्रशासनाच्या, विशेषत: पाेलिसांनी केलेली कारवाई याची परिणिती म्हणून पक्षी जखमी हाेण्याचे प्रमाण घटले - डाॅ. एस. पी. विसावे, उपायुक्त, जिल्हा पशुसंवर्धन. 

यंदा एकही काॅल अाला नाही 
नायलाॅनच्यामांजाचेदुष्परिणाम ‘दिव्य मराठी’ने अापल्या अभियानातून वाचकांसमाेर ठेवले अाणि सुजाण नाशिककरांनीही त्यास दाद देत यंदा नायलाॅनमुक्त संक्रांतीचा संकल्प केला. यंदा मांजात पक्षी अडकल्याचा एकही काॅल अाला नाही. -गाैरवक्षत्रिय, पक्षीमित्र 

संक्रांतीला एकही जखमी पक्षी दाखल नाही, दाेन वर्षाच्या तुलनेत प्रमाण घटले 
सातपूर-अंबडलिंकराेडपरिसरात एक घुबड नायलाॅन मांजात अडकून मृत्युमुखी पडले. याशिवाय गंगापूरराेड अाणि पेलिकन पार्कच्या ठिकाणीही मांजात दाेन पक्षी अडकले हाेते. त्यांना साेडविण्यात अाले. गेल्या दाेन वर्षांच्या तुलनेत पक्षी जखमी हाेण्याचे प्रमाण कमालीचे घटले. -अभिजित महाले, पक्षीमित्र 

काही महाभागांनी केला वापर 
नायलाॅनमांजाचे दुष्परिणाम वारंवार सांगण्यात येत असतानादेखील काही महाभागांनी अशा जीवघेण्या मांजाचा वापर केल्याचेही विदारक चित्र हाेते. विशेषत: सिडकाे, जुने नाशिक अाणि पंचवटी परिसरात नायलाॅनचा अधिक वापर झाला.