आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Divya Property Expo 2014 \',latest News In Divya Marathi

‘दिव्य प्रॉपर्टी एक्स्पो’चे थाटात उद्घाटन, चार बँका, २६ डेव्हलपर्सनी घेतला सहभाग

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर- दैनिकदिव्य मराठीतर्फे ‘दिव्य प्रॉपर्टी एक्स्पो २०१४’चे आयोजन करण्यात आले आहे. त्याचे उद्घाटन शुक्रवारी सायंकाळी हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर क्रेडाई महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष किशोर चंडक यांच्या हस्ते करण्यात आले. शनिवार आणि रविवारी दिवसभर ते सर्वांसाठी खुले राहणार आहे. चार लाखांपासून ते एक कोटीपर्यंतची घरे, फ्लॅट, प्लॉट व्यवसायिक गाळे तसेच मॉल, मल्टिप्लेक्स आदींची माहिती या ठिकाणी सोलापूरकरांना एकाच छताखाली उपलब्ध झाली आहे.
या प्रदर्शनात शहरातील २६ बांधकाम व्यवसायिकांनी आपले प्रकल्प ४० स्टॉलमधून सादर केले आहेत. कर्ज सुविधांसाठी चार बँकांचेही स्टॉल आहेत. या गृहप्रदर्शनाला भेट देणाऱ्या ग्राहकांना आकर्षक बक्षिसे देण्यात येणार आहेत. तसेच पहिल्या दहा बुकिंगवर ग्राहकांना सिल्वर कॉइन भेट मिळेल. या वेळी क्रेडाई महाराष्ट्राचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र शहा, सोलापूर क्रेडाईचे अध्यक्ष सुनील फुरडे, इंद्रधनु प्रकल्पाचे संचालक मिलिंद वेणेगूरकर, एनटीपीसीचे अप्पर सरव्यवस्थापक आर. डी. जयवंत तसेच प्रायोजक इथॉस रियल्टर्सचे चेअरमन तुकाराम गायकवाड, हंसराज घोडमार यांची उपस्थिती होती.
प्रदर्शनाच्या उद््घाटनप्रसंगी प्रमुख पाहुणे किशोर चंडक म्हणाले, बांधकाम व्यवसायिक नेहमी नवनवीन पध्दतीने ग्राहकांसाठी घर साकारत असतो. शासनाच्या करांविषयी नेहमीच बांधकाम व्यवसायिक ग्राहकांच्या बाजूने म्हणणे मांडत असतो. घर, परिसर स्वच्छ ठेवलात तर भविष्यात घर विकताना ग्राहकांना चांगली किंमत मिळते. प्रॉपर्टी एक्स्पोच्या उदघाटनप्रसंगी क्रेडाईचे सुनील फुरडे, किशोर चंडक, आर.डी. जयवंत राजेंद्र कासवा, मिलिंद वेणेगूरकर आदी उपस्थित होते.
आज राशिविषयक कार्यक्रम
तीनदिवस चालणाऱ्या या प्रदर्शनात १२ राशीचे बारा लोक घरे घेताना कसे निर्णय घेतात या विषयावर विश्वास पटवर्धन (पुणे) हे प्रदर्शन ठिकाणी (हरिभाई देवकरण प्रशाला) विनोदी ढंगाने एका कार्यक्रमातून सादर करणार आहेत. शनिवारी सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम सुरू होणार आहे.