आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Divyamarathi Coffee Table Book Publish On Nashik Kumbha Mela

नाशिक कुंभमेळ्यावरील ‘दिव्य मराठी’च्या कॉफी टेबल बुकचे प्रकाशन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
दैनिक दिव्य मराठीने काढलेल्या ‘नाशिक कुंभ : अ स्पिरिच्युअल जर्नी फॉर यंग इंडिया\' या सिंहस्थ कुंभमेळ्यावरील वैशिष्ट्यपूर्ण कॉफी टेबल बुकचे बुधवारी नाशिकमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या हस्ते प्रकाशन झाले. या वेळी आमदार बाळासाहेब सानप, ‘दिव्य मराठी’च्या नाशिक आवृत्तीचे निवासी संपादक जयप्रकाश पवार, राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, ‘दिव्य मराठी’च्या स्पेशल इनिशिएटिव्ह मॅनेजर वृषाली घाटणेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास महाराज, ‘दिव्य मराठी’चे सीईओ निशित जैन, जनसंपर्क अधिकारी विकास लोळगे, महापौर अशोक मुर्तडक, डेप्युटी एडिटर अभिजित कुलकर्णी, चीफ रिपोर्टर नीलेश अमृतकर आदी. - Divya Marathi
दैनिक दिव्य मराठीने काढलेल्या ‘नाशिक कुंभ : अ स्पिरिच्युअल जर्नी फॉर यंग इंडिया\' या सिंहस्थ कुंभमेळ्यावरील वैशिष्ट्यपूर्ण कॉफी टेबल बुकचे बुधवारी नाशिकमध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या हस्ते प्रकाशन झाले. या वेळी आमदार बाळासाहेब सानप, ‘दिव्य मराठी’च्या नाशिक आवृत्तीचे निवासी संपादक जयप्रकाश पवार, राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, ‘दिव्य मराठी’च्या स्पेशल इनिशिएटिव्ह मॅनेजर वृषाली घाटणेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत ग्यानदास महाराज, ‘दिव्य मराठी’चे सीईओ निशित जैन, जनसंपर्क अधिकारी विकास लोळगे, महापौर अशोक मुर्तडक, डेप्युटी एडिटर अभिजित कुलकर्णी, चीफ रिपोर्टर नीलेश अमृतकर आदी.
नाशिक- दैनिक 'दिव्य मराठी'च्या ‘नाशिक कुंभ : स्पिरीच्युअल जर्नी फॉर यंग इंडिया’ या सिंहस्थ कुंभमेळ्यावर आधारीत वैशिष्टयपूर्ण कॉफीटेबल बुकचे प्रकाशन भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जगद‌्गुरू हंसदेवाचार्य महाराज, वल्लभाचार्य महाराज, नरेंद्राचार्य महाराज, आखाडा परिषदेचे अध्यक्ष ग्यानदास महाराज आदींच्या प्रमुख उपस्थितीत बुधवारी झाले.

विविध आखाडे खालशांचे साधू- महंत, मान्यवर, स्थानिक नेते मंडळी हजारो भाविकांच्या साक्षीने झालेल्या या सोहळ्याप्रसंगी सिंहस्थ- कुंभमेळ्याचे धार्मिक, अध्यात्मिक, वैज्ञानिक दृष्टीने असलेले महत्व, नाशिकची वैशिष्ट्ये, परिसरातील मंदिरे प्रेक्षणीय स्थळे अशी सर्वसमावेशक माहिती असलेले हे कॉफीटेबल बुक सर्वांगसुंदर असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली. अत्यंत उच्च दर्जाचे असलेले हे पुस्तक वैशिष्टयपूर्ण असून ते सर्वांनाच उपयोगी पडेल, असे मत शहा यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही युवकांना या पुस्तकातून कुंभमेळा समजण्यास अधिक मदत होणार असल्याचे सांगत पुस्तकाचे कौतुक केले.
यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे, "दिव्य मराठी'चे सीओओ निशित जैन, नाशिक आवृत्तीचे निवासी संपादक जयप्रकाश पवार, डेप्युटी एडिटर अभिजीत कुलकर्णी, जनसंपर्क अधिकारी विकास लोळगे, मॅनेजर स्पेशल इनिशिएटीव्ह वृषाली घाटणेकर, चीफ रिपोर्टर नीलेश अमृतकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
नाशिकच्या नेत्रसुखद छायाचित्रांचा समावेश
धार्मिक आणि पर्यटनीय स्थळे, कृषी, उद्योग, शिक्षण असा विविध क्षेत्रात नाशिकने साधलेला विकास पुस्तकाच्या चौथ्या भागात तर पाचव्या भागात नाशिकमधील मंदिरांच्या छायाचित्रांचा त्यांच्या वैशिष्टयांसह समावेश केला आहे. दिव्य मराठीच्या छायाचित्रकारांसह ज्येष्ठ छायाचित्रकार किशोर अहिरराव प्रसाद पवार यांच्या नेत्रसुखद छायाचित्रांचा यात समावेश आहे. ग्लॉसी पेपरवरील आकर्षक छायाचित्रांच्या मांडणीमुळे हे पुस्तक सर्वांग सुंदर झाले आहे.

पुढील स्लाइडवर वाचा, पुस्तकाचे वेगळेपण...