आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘दिव्य मराठी’च्या हेल्थ एक्स्पाेला उत्साहात प्रारंभ, निराेगी अायुष्यासाठी सारे काही एकाच छताखाली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - अाराेग्य या विषयाला वाहिलेल्या ‘दिव्य मराठी’च्या पहिल्या हेल्थ एक्स्पाेचे उद््घाटन शुक्रवारी महापाैर अशाेक मुर्तडक यांच्या हस्ते माेठ्या उत्साहात पार पडले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक जी. एम. हाेले, रेस अॅक्राॅस अमेरिका रॅम्पवीर डाॅ. हितेंद्र महाजन, अहिरराव प्राॅपर्टीजचे संचालक निखिल अहिरराव यांसह ‘िदव्य मराठी’ नाशिकचे महाव्यवस्थापक मदनसिंह परदेशी डेप्युटी एडिटर अभिजित कुलकर्णी व्यासपीठावर उपस्थित हाेते.
‘दिव्य मराठी’ने अायाेजित केलेला हा हेल्थ एक्स्पाे अहिरराव इन्फ्रास्ट्रक्चरने प्रस्तुत केला असून, नाशिक सिटी सेंटर माॅलचे याला विशेष सहकार्य लाभले अाहे. सिटी सेंटर माॅलच्या दुसऱ्या मजल्यावर रविवार(दि. २७)पर्यंत सकाळी ११ ते रात्री वाजेपर्यंत नाशिककरांसाठी हा एक्स्पाे निःशुल्क सुरू राहणार अाहे. एक्स्पाेला भेट देणाऱ्यांना प्रत्येक तासाला भेटवस्तू जिंकण्याची संधी तर मिळणार अाहेच, शिवाय २५ हजार रुपयांपर्यंतच्या माेफत अाराेग्य तपासण्या, कन्सल्टेशन प्राेसिजर्स काही अटी शर्तींवर मिळणार अाहेत.

जागतिक दर्जाच्या उपचारांची माहिती : नाशिकमधील वैद्यकीय सुविधा, जागतिक दर्जाचे उपचार यांची माहिती तसेच कॅन्सर, हार्ट, डेंटल, अाय हाॅस्पिटल्स, हिमाेथेरपी, अँटीएजिंग अाेबेसिटी यांसारख्या उपलब्ध अत्याधुनिक सुविधांची माहिती यातून मिळेल.
बातम्या आणखी आहेत...