आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लिटरेचर फेस्टिव्हल: अाशयगर्भ चर्चा, साहित्यिक मंथनाचा ‘नजराणा’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ब्लॉगिंग प्रयोग आणि भविष्य या विषयावरील परिसंवादास उपस्थित सायली राजाध्यक्ष, अमोल उद‌गीरकर, मेघना भुस्कुटे यांचा सत्कार करताना लेखक-दिग्दर्शक दत्ता पाटील. - Divya Marathi
ब्लॉगिंग प्रयोग आणि भविष्य या विषयावरील परिसंवादास उपस्थित सायली राजाध्यक्ष, अमोल उद‌गीरकर, मेघना भुस्कुटे यांचा सत्कार करताना लेखक-दिग्दर्शक दत्ता पाटील.
‘दिव्य मराठी लिटरेचर फेस्टिव्हल’ने शनिवारी नाशिककरांना पारंपरिक अाणि नवसाहित्यावरील अाशयगर्भ चर्चेचा नजराणाच पेश केला. केवळ महाराष्ट्रच नव्हे, तर देश-विदेशात अापल्या साहित्यकृतींच्या माध्यमातून अढळ स्थान मिळविलेल्या लेखकांचे विचार जवळून एेकण्याची ही अभूतपूर्व पर्वणीच ठरली, असे मत साहित्यरसिकांनी व्यक्त केले.
 
अतिशय नावीन्यपूर्ण विषयांवरील परिसंवाद, लेखक-कवींची जडणघडण उलगडणारी सत्रे, वाचनानंदात वृद्धी करणाऱ्या कार्यशाळांची अनुभूती घेण्यासाठी कुसुमाग्रज स्मारकाच्या रम्य परिसरात दिवसभर लगबग सुरू हाेती.  
 
विषय : ब्लॉगिंग प्रयोग आणि भविष्य
मुख्य प्रवाहातील माध्यमांमध्ये येणाऱ्या मर्यादा, बंधने नवमाध्यमांवर लिखाण करताना येत नाहीत. शब्दसंख्येची मर्यादा नाही, ना संपादकांचे बंधन, ना सेन्सॉरशिपचे टेन्शन. आपल्या अन् वाचकांच्या आवडीच्या विषयांवर सातत्याने लिखाण करणारे ब्लॉग आज लोकप्रियतेच्या शिखरावर असून त्यातून लाखो वाचकांचा कनेक्टही वाढला आहे. ब्लॉग हे समांतर माध्यम होऊ पहात असून त्याचे भविष्यही चांगले राहणार असल्याचा सूर ‘ब्लॉगिंग : प्रयोग आणि भविष्य’ या विषयावरील चर्चासत्रात उमटला. पत्रकार व ब्लॉगर मुक्ता चैतन्य संवादक होत्या. चर्चासत्रात सहभागी प्रसिद्ध ब्लॉगर्स सायली राजाध्यक्ष, अमोल उदगीरकर व मेघना भुस्कुटे यांनी मांडलेली मते त्यांच्या शब्दात..पुढील स्‍लाइडवर...
 
पुढील स्‍लाइडवर हेही वाचा,
- कॉपीपेस्ट कल्चर ते अभिव्यक्ती स्वातंत्र्य-ब्लॉगिंगसमोरील आव्हाने
- ब्लॉगिंग आणि अर्थकारण
या विषयांवर तज्ञांनी मांडलेली मते.... 
बातम्या आणखी आहेत...