आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘जीएसटी’ने हसवले तर ‘माय’ कवितेने रडविले, बालसाहित्यातून उलगडले लहानग्यांचे विश्व

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सामान्यांपासून ते व्यापाऱ्यापर्यंत साऱ्यांचा चर्चेचा विषय बनलेल्या ‘जीएसटी’विषयी साध्या साेप्या भाषेत कविता सादर करुन अथर्व जगझाप याने प्रेक्षकांना खळखळून हसवले. तर बालक मंदिरातील मनस्वी जगझापने वामन निंबाळकर यांची ‘माय’ कविता सादर करून सभागृहाला भावनिक करून रडविले. कविता म्हणताना प्रत्येक अाेळीमध्ये जीव अाेतल्याने जगझाप भाऊ-बहिणीने सभागृह जिंकले हाेते.

लिटरेचर फेस्टिव्हलअंतर्गत सकाळी ११ वाजता मुक्तायन हाॅलमध्ये ‘बालवाचकांचे बदलते विश्व’ या विषयावर बालकांनी कसदार साहित्य सादर करून भरभरून दाद मिळवली. बालवयातही लहानग्यांमध्ये असलेले वैश्विक भान.. अत्यंत रसाळपणे सादर केल्या जाणाऱ्या वैविध्यपूर्ण कविता.. आणि तितक्याच सहज अन् दमदार कथांचे सादरीकरण... मुलांच्या जगतातले असे विविध पैलू नाशिककरांनी अनुभवले. विनायक रानडे, स्वाती गाेरवाडकर, तन्वी देवडे यांनी उपस्थितांचे स्वागत करून कार्यक्रमाची रूपरेषा विशद केली.
 
या वेळी राजहंस प्रकाशनचे संपादक संजय जाेशी व बंगळुरूहून कवयित्री अनघा तांबाेळी उपस्थित हाेत्या. अपर्णा क्षेमकल्याणी यांनीही बालविश्वात रममाण हाेऊन ‘एक हाेती खिडकी, फार फार चिडकी’ ही बालकविता सादर केली. श्लाेक लाेहिते हिने ‘मुलांमधील संस्कार’ याविषयी इंग्रजीत कविता सादर केली. तसेच अाबा गाेकर्ण, मल्हार  क्षेमकल्याणी, शर्वरी चंद्रात्रे, निखिल कुलकर्णी, नेहा काेठावदे, प्रणव मिश्रा, रुचिता जाधव, पाैरवी चंद्रात्रे, अर्णव चंद्रात्रे, रूधीरा वाकेकर यांनी सहभाग नाेंदविला. स्वाती गाेरवाडकर व तन्वी देवडे यांनी सूत्रसंचालन केले.
 
पुढील स्‍लाइडवर...कार्यक्रमात हातात निषेध फलक घेऊन कविता सादर करताना शौनक भांबोरे...
बातम्या आणखी आहेत...