आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनातील गोष्‍ट लिहिण्‍यासाठी वाचत रहा; लेखिका नीलिमा, सावी शर्मांनी सांगितली लेखनाची सुत्रे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - प्रत्येकाच्या मनात एक गोष्ट असते, ती लोकांसमोर आणण्याची इच्छाही असते. परंतु ती गोष्ट कागदावर कशी लिहावी हे ठाऊक नसते. त्यासाठी सतत वाचत राहिले पाहिजे. त्यामुळे शब्दांची ओळख होते आणि कसे लिहावे तेसुद्धा समजते. मात्र यशस्वी लेखक होणे सोपे नसले तरी त्यात यश मिळू शकते असा सल्ला प्रख्यात लेखिका नीलिमा दालमिया आणि युवा लेखिका सावी शर्मा यांनी उदयोन्मुख लेखकांना दिला.
 
लेखन करिअर की छंद या विषयावर आयोजित चर्चासत्रात माय डिअरेस्ट फादर, कस्तुरबा कादंबरीच्या लेखिका नीलिमा दालमिया आणि सेट अॉफ कँफेच्या  तरुण लेखिका सावी शर्मा यांनी भाग घेत यशस्वी लेखक होण्यासाठी मार्गदर्शन केले. अंजना तिवारी यांनी या चर्चासत्राचे उत्कृष्टपणे संचालन करून दोघींना चांगले बोलते केले.
 
नीलिमा दालमिया यांनी लेखिका म्हणून झालेल्या प्रवासाबद्दल माहिती देताना म्हटले, मी लेखिका होईन असे मला कधीही वाटले नव्हते. खरे तर माझी आई चांगली लेखिका आहे, परंतु मी स्वतः कधी लिहू शकेन असे वाटले नव्हते. एकदा मी ब्यूटी पार्लरमध्ये गेली असता मैत्रिणीशी चर्चा करताना तीने मला लिहिण्याचा सल्ला दिला आणि एक पुस्तकही वाचायला सांगितले. नंतर मलाही लिहावेसे वाटू लागले. माझ्या वडिलांचे महात्मा गांधी आणि जिन्ना यांच्याबरोबर जवळचे संबंध होते. त्यामुळे त्यांच्यावरच लिहावे असे मला वाटू लागले. मी आईशी बोलले. तीनेही प्रोत्साहन दिले आणि मी वडिलांवरील पुस्तक लिहून काढले. ते इतके यशस्वी होईल असे मला वाटले नव्हते. वडिलांवर पुस्तक लिहित असतानाच मला कस्तुरबा गांधी यांच्यावर पुस्तक लिहावेसे वाटले. कस्तुरबा आणि माझ्या आईच्या जीवनात बरेच साम्य आहे. या पँशनमधूनच मी पुस्तक लिहिले. मी पँशन म्हणूनच सुरुवात केली आणि आज यशस्वी लेखिका म्हणून मान्यता मिळाली आहे.
 
24 वर्षीय सावी शर्माने लेखिका म्हणून आपला प्रवास उलगडताना म्हटले, मी लेखिका होण्याचेच ठरवले होते. मी दुसरीला असताना पहिली कविता लिहिली होती.  मी चांगले लिहू शकते असा विश्वास असल्याने लेखिका म्हणूनच कारकिर्द घडवण्याकडे लक्ष दिले. यासाठी सीए होण्याचे सोडले. आईवडिल नाराज झाले परंतु मी माझ्या निर्णयावर ठाम होते. कँफे हा आजच्या तरुणांच्या जीवनाचा अविभाज्य भाग आहे. कँफेमध्ये मित्र मैत्रिणी, नातेवाईक, नवीन मित्र-मैत्रिणी भेटतात. येथेच लग्नेही जुळतात. त्यामुळे या कँफेच्या पार्श्वभूमीवरच मी पहिली कादंबरी लिहिली आणि ती स्वत:च प्रकाशितही केली. कादंबरी बेस्ट सेलर ठरली.

नवोदित लेखकांना सल्ला देताना नीलिमा दालमिया यांनी सांगितले, लेखक होणे सोपे नाही. मात्र लिखाणाची इच्छा असेल तर लिहित राहावे. प्रकाशक मिळणे कठिण असते, परंतु स्वतःवरील विश्वास ढळू न देता काम करीत राहिले तर यश मिळतेच. चांगला लेखक होण्यासाठी सतत वाचत राहिले पाहिजे.
 
सावी शर्माने सल्ला देताना सांगितले, जे करावेसे वाटते तेच मनापासून केले तरच त्यात यश मिळते. संकटे आली तरी घाबरायचे नसते. लिहिण्याची मनापासून इच्छा असेल तर लिहित राहिले पाहिजे. मात्र लिहिताना प्रकाशक मिळेल का याचा विचार न करता लिखाणाकडेच लक्ष दिले पाहिजे. एकदा लिहून पूर्ण झाले की नंतर अनेक मार्ग असतात. प्रकाशकही मिळतात आणि यशही मिळते.
 
पुढील स्‍लाइडवर...सावीमुळे एक तरुण झाला लेखक...
 
बातम्या आणखी आहेत...