आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'हातांच्या माध्यमातून जग पाहतात अन् छायाचित्रांद्वारे ते प्रत्यक्षात कागदावर उतरते\'!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पार्थो भौमिक आणि भावेश पटेल यांनी आपली मते मांडली. - Divya Marathi
पार्थो भौमिक आणि भावेश पटेल यांनी आपली मते मांडली.
नाशिक- ज्यांना जीवनातील रंग दिसत नाहीत, निसर्ग सौंदर्य त्यांनी कधी पाहिले नाही. त्यांच्या कार्यकतृत्वावर मात्र कायम शंका घेतली जाते. ते देखील सुंदर चित्र सुंदर चित्र काढून लोकांना आर्श्चयचकित करु शकतात यावर विश्वास बसणार नाही. मात्र हे प्रत्यक्षात होवू शकते.
मात्र हे प्रत्यक्षात होऊ शकते. मुंबईच्या पार्थो भौमिक यांनी गेल्या11 वर्षांत देशभरातील 1100 नेत्रहीनांना अशा प्रकारे फोटोग्राफीचे प्रशिक्षण देवून या कलेचा आनंद दिला आहे.
 
दिव्यराठीच्या लिटरेचर फेस्टिव्हलमध्ये रविवारी दुपारच्या सत्रात भौमिक आणि त्यांचा अंध विद्यार्थी भावेश पटेल यांची 'अ वर्ल्ड ऑफ पॉसिबिलीटीज बाय युझ ऑफ लाईफ' या विषयावर प्रकट मुलाखत झाली. डॉ. अजंना तिवारी यांनी त्यांना बोलते केले. 
 
पार्थो हे नोकरदार, मात्र 2006 साली फ्लोरा फाऊंटन परिसरात फिरत असतांना फुटपाथवर त्यांना एक मासिक सापडले. अंध व्यक्ती देखील फोटो ग्राफी करु शकतात असा लेख त्यांनी त्यात वाचला. तेव्हापासून पार्थो यांनी हे व्रत हाती घेतले आणि एका विद्यार्थ्यांपासून सुरु झालेला या प्रशिक्षणाचा उपक्रम आता 1100 अंधापर्यंत जावून पोहचला असल्याचे पार्थो यांनी सांगितले. जगातील या कलेचा आनंद अंधांना देखील  घेता यावा व त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद हा इतरांना प्रोत्साहन देणार आहे. जगात कुठलीही गोष्ट अशक्य नाही हे दाखवून देणारा असल्याचे पार्थो यांनी सांगितले. दैनिक भास्कर डॉट कॉमचे संपादक अनुज खरे यांनी भावेश पटेल व पार्थो यांचा सत्कार केला. ऐश्वर्या उखाणे हिने सूत्रसंचालन केले.
 
त्याने काढले कॅटरिनाचे फोटो-
 
मुंबईतील सेंट झेव्हीयर्स कॉलेजचा अंध विद्यार्थी भावेश पटेल याला पार्थो भौमिक यांनी फोटोग्राफी शिकवली. काही दिवसापूर्वीच त्याने लक्स साबणाच्या कँपेनसाठी अभिनेत्री कॅटरिनाचे फोटो काढले. हे छायाचित्र पाहून खुद्द कॅटरिनाला देखील आश्चर्याचा धक्का बसला. विशेष म्हणजे पार्थो आग्रहास्तव भावेशला व्यावसायिक फोटो ग्राफरसारखे मानधन देखील मिळाले. पार्थो याने अनेक ठिकाणी अशा अंध छायाचित्रकारांच्या फोटोंचे प्रदर्शन भरुन आश्चर्याचा धक्का दिला.

स्पर्श, अनुभव आणि आवाजाचा आधार घेवून काढले जातात फोटो-
 
दृष्टी नसलेल्यांना छायाचित्रकारांना प्रशिक्षण  देतांना स्पर्श, अनुभव, आवाजाचा आधार घेतला जातो. विशेष म्हणजे त्यांनी काढलेल्या छायाचित्रांचा आस्वाद घेण्यासाठी देखील स्पर्शातून अंदाज येईल, छायाचित्राला स्पर्थ केल्यानंतर त्यांची माहीती ऐकून दाखवणारे पुस्तक खास प्रकाशित केले जाते. अशी पुस्तके यावेळी रसिकांना दाखवण्यात आली. दृष्टी असणाऱ्यांना देखील डोळ्यावर पट्टी बांधून छायाचित्र काढण्याचा अनूभव आम्ही देत असल्याचे पार्थेो यांने सांगितले. जगात कुठलीच गोष्ट अशक्य नसल्याचे या माध्यमातून पुढे येते. परमेश्वर जेव्हा एखादी शक्ती काढून घेतो तेव्हा दुसरी कुठली तरी शक्ती देतो, ती फक्त ओळखता यायला हवे असा निष्कर्ष या सत्राच्या समारोप प्रसंगी मुलाखतकार अंजना तिवारी यांनी काढला. 
 
प्रत्यक्षाहून प्रतिमा सुंदर -
 
हे सत्र संपल्यानंतर अंध छायाचित्रकारांचे पुस्तक पाहिल्यानंतर रसिकांनी गर्दी केली होती. या छायाचित्रांच्या पाठीमागचे कष्ट आणि भावना समजून घेतल्यानंतर प्रत्यक्षाहून प्रतिमा सुंदर अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली. 
बातम्या आणखी आहेत...