आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अफगणिस्तानला आता कळाले भारत हाच खरा प्रामाणिक मित्र- राजीव डोग्रा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भारताचे माजी राजनैतिक अधिकारी राजीव डोग्रा - Divya Marathi
भारताचे माजी राजनैतिक अधिकारी राजीव डोग्रा
नाशिक- काही वर्षांपूर्वी अफगाणिस्तानच्या एका राष्ट्राध्यक्षाने कश्मिरमध्ये पाच लाख जिहादी पाठवतो अशी ऑफर पाकिस्तानच्या पंतप्रधानांना दिली होती. तोच अफगाणिस्तान आता भारताच्या जवळ आला आहे. कारण भारत हाच खरा प्रामाणिक मित्र असल्याची जाणीव त्याला झाली आहे, असे भारताचे माजी राजनैतिक अधिकारी राजीव डोग्रा यांनी सांगितले. ते म्हणाले की अफगणिस्तानात लष्करी मदत करणे भारतासाठी व्यावहारिकदृष्ट्या अवघडच आहे. 
 
दिव्य मराठी आयोजित लिटरेचर फेस्टीव्हलमध्ये शनिवारी (ता. ४ नोव्हेंबर ) सकाळाच्या सत्रात आंतरराष्ट्रीय संबधांच्या अभ्यासक प्रो. डॉ. मेधा साईखेडकर यांनी त्यांना अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि भारताचे सबंध या विषयावर बोलते केले. डोग्रा यांनी अफगाणिस्तान व पाकिस्तानमध्ये भौगोलिक विभागणी करणाऱ्या डयुराँड रेषेवर पुस्तक लेखन केले आहे. तो संदर्भ देत डॉ. मेधा यांनी उपस्थित केलेल्या विविध प्रश्नांची उत्तरे डोग्रा यांनी दिली. 
 
ते म्हणाले की, पुढील काळात भारताचे अफगणिस्तान सोबतचे सबंध नेमके कसे राहतील हे आताच सांगणे कठीण आहे. कारण उत्तर कोरीयात नेमके काय होईल यावर बऱ्याच घडामोडी अवलंबून असतील. अमेरिका आता  एकमेव सुपरपॉवर नाही. रशिया आणि चीन अमेरिकेला आव्हान देत आहे. भारतात प्रवेशासाठी अफगाणिस्तानचा मार्ग सर्वच घुसखोरांना सोईचा आहे. त्यामुळेच तेथील प्रत्येक  हालचालीवर भारताचे बारकाईने लक्ष आहे. इंग्राजांनाही हे ठावूक असल्याने त्यांनी अफगणिस्तानावर कब्जा ठेवण्याचा आटोकाट प्रयत्न केला होता.   
बातम्या आणखी आहेत...