आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पुणे: बाहेर खेळायला जाते म्हणून आई-वडिल रागावल्याने 14 वर्षीय मुलीची आत्महत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 
पुणे- पुण्यातील हडपसर भागात इयत्ता आठवीत शिकणा-या 14  वर्षाच्या मुलीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. रविवारी दुपारी ही घटना घडली. सतत मित्र-मैत्रिणींसोबत बाहेर जाते म्हणून आई-वडिल रागवल्याने मुलीने हे पाऊल उचलल्याचे सांगितले जात आहे.
 
निकीता युवराज शिर्के ( वय-14, आदर्शनगर, माळवाजी, हडपसर) असे मृत मुलीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसर भागातील माळवाडी येथे शिर्के कुटुंब राहते. शिर्के हे वाहनचालक असून त्यांना गृहिणी पत्नी व मुला-मुलीसह राहतात. थोरली मुलगी निकीता 14 वर्षाची असून ती तेथेच जवळील एका शाळेत आठवती शिकते. तर तिचा भाऊ चार वर्षाचा आहे.
 
रविवारी शिर्के हे पती-पत्नी घराबाहेर गेले होते. त्याआधी काही दिवसापासून निकीता अभ्यास सोडून मित्र-मैत्रिणींसोबत बाहेर खेळायला जायची. यामुळे आई-वडिल तिच्यावर रागावत होते. मात्र, रविवारी दुपारी आई-वडिल घराबाहेर जाताच निकीताने चार वर्षाच्या भावासमोरच राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आई-वडिल बाहेरून आल्यानंतर ही बाब समोर आली. त्यानंतर त्यांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तिचा मृतदेह ताब्यात घेत पोस्टमार्टम करण्यासाठी पाठवून दिला. हडपसर पोलिस पुढील तपास करत आहेत.
बातम्या आणखी आहेत...