आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘ती’ची निवडणूक, राजकारणाच्या माध्यमातून महिलांचे सक्षमीकरण

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आज जवळपास सर्वच क्षेत्रांत महिला पुरुषांच्या बरोबरीने यशस्वी होत असल्या तरी मतस्वातंत्र्य किंवा निर्णयक्षमतेचा विचार करता पुरुषांचा प्रभाव कितीतरी अधिक असल्याचे दिसते. या मागचे मुख्य कारण म्हणजे राजकारणाविषयी महिला वर्गात असलेली अनास्था. खरे तर, निर्णयक्षमता निर्माण करण्याचे आणि व्यवस्था बदलण्याची ताकद असलेले क्षेत्र म्हणजे राजकारण. महापालिकेची येती निवडणूक म्हणजे राजकीय पर्वणीच. तेव्हा महिलांना राजकीयदृष्ट्या सजग करण्यासाठी, राजकारणातील संधी त्यांना उपलब्ध करून देण्यासाठी त्या माध्यमातून त्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी ‘दिव्य मराठी’ घेऊन येत आहे ‘ती’ची निवडणूक हा आगळावेगळा उपक्रम. 
 
मतदारसंख्येचा विचार करता महिलांचे प्रमाण सुमारे ५० टक्के असले तरी निवडणुकीतील त्यांचा सक्रिय सहभाग नाममात्रच दिसतो. हा टक्का वाढावा म्हणून ‘ती’ची निवडणूक उपक्रमाच्या माध्यमातून ‘दिव्य मराठी’ आपले व्यासपीठ खुले करून देत आहे. प्रत्येक नाशिककर मुलगी आणि महिला यांच्यासाठी या फोरमवर हक्काची जागा असेल. जिथे राजकीय चर्चा, मत-मतांतरे यापासून मतदार नोंदणी, महिला मतदारांच्या संख्येत वाढ अशा प्रक्रियांत ‘ती’चा सहभाग असेल. तेव्हा नव्या वर्षातल्या नव्या निवडणुकीच्या झंझावाताला सामोरे जाण्यासाठी सज्ज व्हा! फक्त मतदानाच्या दिवशी बटन दाबण्यापुरती तुमची भूमिका संकुचित ठेवू नका. आगामी महापालिका निवडणुकीत नाशिककर महिला मतदारांचा आवाज बुलंद करण्यासाठी, महिला मतदारांचे प्रश्न प्रकाशात आणण्यासाठी ‘दिव्य मराठी’ या माध्यमातून पुढाकार घेत आहे. अशा आगळ्या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवण्यासाठी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंच्या जन्मदिनापेक्षा चांगले औचित्य ते कोणते? तेव्हा जानेवारीला ‘ती’ची निवडणूक उपक्रमासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहा. 
 
मंगळवार, दिनांक जानेवारी 
वेळ: दुपारी वाजता 
स्थळ : लोकमान्य सभागृह 
माणेकशानगर, काठेगल्ली, द्वारका 
 
बातम्या आणखी आहेत...