आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वप्नातील घर अन् घरासाठी सर्व काही एकाच छताखाली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - तुमच्या स्वप्नातील घर, घरासाठी अावश्यक असणारा वित्त पुरवठा अाणि मनपसंत घर साकारण्यासाठी लागणाऱ्या विविध वस्तू एकाच छताखाली उपलब्ध हाेणार अाहेत. निमित्त अाहे, ‘दिव्य मराठी’तर्फे अायाेजित प्राॅपर्टी एक्स्पाे प्रदर्शनाचे. पहिल्यांदाच अशा प्रकारच्या प्रदर्शनांची संकल्पना ‘दिव्य मराठी’ने अाणली असून, शुक्रवार, शनिवार, रविवार असे तीन दिवस भरणाऱ्या प्रदर्शनात शहरातील गृहप्रकल्पांची, रिअल इस्टेटसंबंधी माहिती एकाच छताखाली मिळणार अाहे.
पार्कसाइड अाणि अहिरराव इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. यांच्या विशेष सहकार्यातून हा एक्स्पाे भरत अाहे. मुंबई, पुणे, नाशिक हा सुवर्णत्रिकाेण मानला जाताे, नाशिकचा वाढता विकासाचा वेग पाहता येथे गुंतवणूक म्हणूनच नाही, तर सेकंड हाेम म्हणूनही गुंतवणुकीला पुरेपूर वाव अाहे. झपाट्याने हाेत असलेल्या शहरीकरणात बांधकाम व्यावसायिकांकडून साकारले जात असलेले विविध गृहप्रकल्प, व्यावसायिक प्रकल्प या एक्स्पाेतून सादर केले जाणार अाहेत.

शेतजमीन, प्लाॅट, फ्लॅट, बंगलाे, राे-हाउसेस, पेंट हाउसेस, अार्किटेक्चर्स, इंटेरियर डिझायनर्स, वित्तीय संस्था यांसारख्या घरासाठी लागणाऱ्या विविध गाेष्टंीही या एक्स्पाेमध्ये उपलब्ध असतील. ग्राहकांसह व्यावसायिकांसाठीही ही संधी आहे. ‘दिव्य मराठी’ने अायाेजित केलेल्या या एक्स्पाेसाठी माेजकेच स्टाॅल्स शिल्लक असून, स्टाॅल बुकिंगसाठी प्रवीण (८३९०३०९८३१), प्रवीण सचान (७५०७७७७२४०) यांच्याशी संपर्क साधावा.

एक्स्पाेचे स्थळ वेळ
{दिनांक : २३,२४ २५ सप्टेंबर २०१६
{सकाळी : १०ते रात्री पर्यंत.
{स्थळ : साैभाग्यमंगल कार्यालय, रिलायन्स पेट्राेल पंपाजवळ, दिंडाेरीराेड, म्हसरूळ, नाशिक-४.
बातम्या आणखी आहेत...