आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘दिव्य मराठी’ प्राॅपर्टी एक्स्पाेचे अाज उद‌्घाटन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - ‘दिव्यमराठी’च्या प्राॅपर्टी एक्स्पाेचे उद‌्घाटन शुक्रवारी (दि. २३) सकाळी १०.३० वाजता महापाैर अशाेक मुर्तडक अाणि महापालिका अायुक्त अभिषेक कृष्णा यांच्या हस्ते हाेणार अाहे. ‘दिव्य मराठी’च्या नाशिक अावृत्तीचे महाव्यवस्थापक मदनसिंह परदेशी निवासी संपादक जयप्रकाश पवार यावेळी उपस्थित असतील. रुंग्टा ग्रृप शांतुषा डेव्हलपर्स यांच्या विशेष सहकार्यातून हा एक्स्पाे हाेत असून, त्यात नामांकित बांधकाम व्यावसायिकांकडील विविध गृहप्रकल्प, घर, फ्लॅटस‌्, शेती यांचे असंख्य पर्याय एकाच छताखाली उपलब्ध असल्याने नाशिककरांना विशेषत: पंचवटीकरांना त्यांच्या स्वप्नातील घरकुल शाेधण्याची ही नामी संधी चालून अाली अाहे.
पार्कसाइड अाणि अहिरराव इन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. यांच्या विशेष सहकार्यातून हा एक्स्पाे भरत अाहे. केंद्र सरकारनेअापल्या कर्मचाऱ्यांना सातवा अायाेग मंजुर केला असून लवकरच सात महिन्यांच्या फरकासह रक्कम कर्मचाऱ्यांच्या हाती पडेल असे सांगितले जात अाहे. ही रक्कम हाती अाल्यानंतर त्यातील बहुतांश वाटा हा रिअल इस्टेट क्षेत्रात गुंतविला जाईल असा अंदाज गुंतवणूक क्षेत्रातील जाणकार व्यक्त करीत अाहेत. यामुळेच मुंबई, ठाणे उत्तर महाराष्ट्रातून घरांसाठी सर्वाधिक पसंती असलेल्या नाशिकच्या रिअल इस्टेटमध्येही तेजी येवू शकते असे वातावरण निर्माण झाले अाहे. या पार्श्वभुमीवर हे प्रदर्शन नाशिककरांसाठी लाभदायी ठरणार अाहे. नाशिककरांना येथे स्वप्नातील घर शाेधतांनाच घरासाठी सर्वकाही एकाच छताखाली उपलब्ध असेल.

यापूर्वीचे सर्व प्रदर्शन ठरले यशस्वी : यापुर्वीदिव्य मराठीने इंदिरानगर, उंटवाडी, नाशिककराेड , गंगापूरराेड येथेही प्राॅपर्टी एक्स्पाे घेतले त्याला उत्स्फुर्त प्रतिसाद नाशिककरांनी िदला. जागेवरच फ्लॅटस‌्ची नाेंदणीही झाली. याच पाश्र्वभुमीवर हे पाचवे प्रदर्शनही ग्राहकांना लाभदायी ठरेल.

हेअसेल प्रदर्शनात : शहरातबांधकाम व्यावसायिकांकडून साकारले जात असलेले विविध गृहप्रकल्प, व्यावसायिक प्रकल्प या एक्स्पाेतून सादर केले जाणार अाहेत. शेतजमीन, प्लाॅट, फ्लॅट, बंगलाे, राे-हाउसेस, पेंट हाउसेस, शाॅप्स, अाॅफीसेस, वाॅटर प्युरीफायर यांसारख्या घरासाठी लागणाऱ्या विविध गाेष्टंी येथे एकाच छताखाली उपलब्ध असतील.
स्थळ : साैभाग्य मंगल कार्यालय, रिलायन्स पेट्राेलपंपाजवळ, दिंडाेरीराेड, नाशिक
वेळ : रविवारपर्यंत दरराेज सकाळी ११ ते रात्री वाजेपर्यंत .
बातम्या आणखी आहेत...