आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘दिव्य मराठी’च्या प्रतिनिधी प्रियांका डहाळे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- ‘दिव्यमराठी’च्या मुंबई कार्यालयातील सांस्कृतिक प्रतिनिधी प्रियांका डहाळे यांच्या पार्थिवावर आज (मंगळवार) अमरधाम येथे अत्यंत शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
प्रियांका डहाळे (वय ३०) यांचे सोमवारी रात्री साडेआठच्या सुमारास अपघाती निधन झाले. १४ मे राेजी त्यांचा साखरपुडा ठरलेला होता. त्याची खरेदी करून मुंबईहून नाशिकला परतत असताना त्या प्रवास करत असलेल्या कारने वाळूच्या ट्रकला मागून धडक िदली. पाथर्डी फाट्याजवळ घडलेल्या या अपघातात प्रियांका यांच्यासह चालकाचा जागीच मृत्यू झाला. चित्रपट, नाट्य आणि कला हे प्रियांका यांच्या आवडीचे विषय होत. ‘अनावृत रेषा’ हा त्यांचा काव्यसंग्रहदेखील गाजला.

नवोदितांच्या पहिल्या काव्यसंग्रहासाठी यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातर्फे दिला जाणारा तृतीय क्रमांकाचा विशाखा काव्य पुरस्कार त्यांना प्राप्त झाला होता. त्यांनी पुण्यातील रानडे इन्स्टिट्यूटमधून मास कम्युनिकेशनची पदवी घेतली हाेती. सुरुवातीच्या काळात त्यांनी "लोकसत्ता'साठी मुक्त पत्रकार म्हणून काम केले होते. त्यानंतर त्या ‘दिव्य मराठी’त रुजू झाल्या होत्या. त्यांच्या पश्चात आजी, आई, वडील, बहीण, भाऊ असा परिवार आहे.
बातम्या आणखी आहेत...