आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘संधी अमर्याद, हवी फक्त जिद्द’; ‘दिव्य मराठी’ उत्सवात चार यशस्वी उद्योजिकांनी साधला नाशिककरांशी संवाद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - आजच्या कॉर्पोरेट कल्चरच्या जमान्यात यशस्वी उद्योजिका होण्यासाठी अमर्याद संधी उपलब्ध असून, त्या मिळविण्यासाठी आपण मात्र सदैव सज्ज असले पाहिजे. मात्र, त्यासाठी अंगी यशस्वी होण्याची ऊर्मी आणि जिद्दही आवश्यक आहे, अशा शब्दांत चार यशस्वी उद्योजिकांनी नाशिककरांशी मनमोकळा संवाद साधला.
‘दिव्य मराठी’ नाशिक आवृत्तीच्या तिसर्‍या वर्धापनदिनानिमित्त आयोजित ‘दिव्य मराठी उत्सव’अंतर्गत शंकराचार्य न्यास संकुलातील डॉ. कुर्तकोटी सभागृहात ‘यशस्वी उद्योजिका बनण्यासाठी’ या विषयावरील परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. त्यात हावरे कन्स्ट्रक्शनच्या अध्यक्षा उज्ज्वला हावरे, ब्यूटिकच्या संचालिका माया परांजपे, निसर्ग निरामय-एक्झॉटिक व्हेजिटेबल प्रोड्युसरच्या संचालिका अंजली चुरी व श्री इंजिनिअरिंगच्या संचालिका अपूर्वा जाखडी या चार वेगवेगळ्या क्षेत्रातील यशस्विनींनी उद्योग-व्यवसाय सुरू करू पाहणार्‍या किंवा त्यात कार्यरत असलेल्या नाशिककर भगिनींशी संवाद साधला.
पुरुषप्रधान संस्कृतीत स्त्री म्हणून व्यवसाय उभा करण्यात कुठलीही अडचण आली नाही. मात्र, जो व्यवसाय करायचा त्याबद्दल पुरेशी माहिती असावी आणि ती नसेल तर ती मिळवून घ्यायची ताकद असावी. मर्यादांच्या जोखडात न अडकता स्वत:ला सिद्ध करायला निघालात की, अवघड वाटणारे सर्व सोपे होत जाते आणि व्यवसायातून मिळणारे पैसे दिसू लागले की, सुरुवातीला विरोध करणारे स्वत:च मदतीला तयार असतात, असेही मत त्यांनी व्यक्त केले. ‘दिव्य मराठी’चे युनिट हेड मदनसिंह परदेशी, निवासी संपादक जयप्रकाश पवार यांनी यशस्वी उद्योजिकांचा सत्कार केला. उत्तरा मोने यांनी खुमासदार सूत्रसंचालन करत सत्कारार्थींच्या यशाचा प्रवास उपस्थितांपर्यंत पोहोचवला.
पुढील स्लाईडमध्ये या कार्यक्रमाची अधिक छाया चित्रे... .
"प्रश्नोत्तरांमधून मिळालेल्या काही व्यावसायिक टिप्स" पुढे वाचा...