आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘ती’ची निवडणूक उपक्रम अाजपासून

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक -  आगामी महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने शहरातील महिला मतदारांसाठी ‘दिव्य मराठी’तर्फे आयोजित ‘ती’ची निवडणूक हा विशेष कार्यक्रम काठे गल्लीतील माणेकशानगरमधील लोकमान्य सभागृहात मंगळवारी (दि. ३) दुपारी वाजता आयोजित करण्यात आला आहे. 
 
निवडणुकीच्या काळात महिलांचे म्हणणे आणि त्यांची मते यांना प्राधान्याने प्रकाशात आणण्याचा मुख्य उद्देश या कार्यक्रमामागे आहे. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जन्मदिनाचे अाैचित्य साधत या उपक्रमास सुरुवात होत आहे. या कार्यक्रमास परिसरातील महिलांनी उपस्थित राहून त्यांच्या प्रभागाच्या समस्या आणि आगामी नगरसेवकांकडून विकासाच्या अपेक्षा मांडाव्यात, असे आवाहन ‘दिव्य मराठी’च्या वतीने करण्यात येत आहे. 
अाज हाेणार जागर... 

{मंगळवार, दि. जानेवारी दुपारी वाजता. 
{ स्थळ : लोकमान्य सभागृह, माणेकशानगर, काठेगल्ली, द्वारका 
बातम्या आणखी आहेत...