आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कामगारांची दिवाळी होणार गोड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सातपूर- दिवाळीच्या पार्श्वभूमीवर "सीटू'ने जिल्ह्यातील विविध कंपन्यांमध्ये वेतनवाढ बोनसची यशस्वी बोलणी केल्याने कामगारांची दिवाळी गोड होणार आहे. बोनसच्या माध्यमातून कामगारांना 10 हजार रुपयांपासून 35 हजार रुपयांपर्यंतचा लाभ मिळणार असल्याने, त्यांना खरेदीचे वेध लागले असून, बाजारपेठा देखील गर्दीने फुलू लागल्या आहेत.
जिल्ह्यातील बहुतांश तरुण सीटूच्या नेतृत्वाखाली औद्योगिक वसाहतींमधील विविध कंपन्यांमध्ये नोकरी करतात. दिवाळीचा सण जवळ येताच या कर्मचाऱ्यांना बोनसचे वेध लागतात. त्या पार्श्वभूमीवर वाढत्या महागाईचा मुद्दा उपस्थित करून कामगारांना भरघोष बोनस मिळवून दिली. तसेच वेतन कराराबाबतही सीटू व्यवस्थापनाने यशस्वी चर्चा केली आहे.अन्य कारखान्यांमध्येही युनियनची चर्चा सुरू असल्याची माहिती युनियनचे अध्यक्ष आर. एस. पांडे यांनी दिली. हा करार यशस्वी करण्यासाठी सीताराम ठोंबरे सतीश खैरनार, देवीदास आडोळे, संतोष कुलकर्णी, हरिभाऊ तांबे, तुकाराम सोनजे, भूषण सातळे आदींनी परिश्रम घेतले.