आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

२० हजार अनाथ बालकांना दिवाळीमध्ये मायेची ऊब

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - दिवाळीची मजा सहकुटुंब लुटण्याचा आनंद काही अाैरच असतो. परंतु, अाज असेही अनेक मुलं अाहेत ज्यांना अाई-वडीलच नाहीत. अशा मुलांसाठी बालगृहांची व्यवस्था करण्यात अाली असली तरीही गेल्या दाेन वर्षांपासून भाेजन अनुदानच मिळाले नसल्याने संबंधित बालकांचा उदरनिर्वाह कसा करावा, असा यक्षप्रश्न राज्यभरातील बालगृहचालकांसमाेर उभा ठाकला अाहे. दिवाळीच्या काळात या प्रश्नाने अधिक उग्र रूप धारण केले. परंतु, राज्यातील विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी दिवाळीच्या सुटीच्या काळात सुमारे २० हजार बालकांना अापल्या घरी नेऊन त्यांचे लाडकाेड केले. त्यामुळे मुलांना दिवाळीपुरते ‘घर’ मिळाले अाणि युवकांनाही छाेट्या पाहुण्यांची सेवा करण्याची संधी मिळाली.
महिला अाणि बालविकास विभागाची मान्यता असलेली ९९६ स्वयंसेवी बालगृहे राज्यात आहेत. यात सुमारे ८० हजार अनाथ आणि काळजी संरक्षणाची गरज असलेली बालके निवास करतात. या बालकांच्या पोषणासाठी राज्य शासन प्रतिदिन प्रतिबालक अवघे २१ रुपये अनुदान देते.

अाैरंगाबाद : ३७ बालकांची दिवाळी गोड
सातारा परिसरातील भगवानदादा बालिकाश्रम अाणि याेगेश्वरी बालकाश्रमात अनुक्रमे २२ मुली अाणि १५ मुलांना अाई-वडील नाहीत. त्यांना दानशूरांनी दिवाळीत घरी नेले. भाऊबिजेला नंदीग्राम साेसायटीने दिवसभर अाश्रमातील मुलांना बाहेर नेऊन दिवाळी साजरी केली, अशी माहिती बालिकाश्रमच्या चालक कविता वाघ यांनी दिली.

नाशिक : ३०० चेहरे अानंदाने खुलले
२५ स्वयंसेवी बालकाश्रमातील ३०० बालकांना दिवाळीचा अानंद देण्यासाठी नातेवाईक अाणि सामाजिक कार्यकर्त्यांनी बालकांना घरी नेले. या बालकांप्रति समाज संवेदनशील अाहे. मात्र, शासनाच्या भावना बाेथट झालेल्या दिसतात, असे बालगृहचालक संघटनेचे पदाधिकारी रवींद्रकुमार जाधव यांनी सांगितले.

अहमदनगर: ५७ बालगृहांना पाहुणचार
अहमदनगरमध्ये ५७ बालगृहांत सुमारे साडेसहा हजार मुले अाहेत. लायन्स क्लबचे सदस्य अाणि अन्य काही सामाजिक कार्यकर्त्यांनी दिवाळीत या बालकांना घरी नेऊन त्यांचा पाहुणचार केला, अशी माहिती प्रियदर्शन ग्रामीण अादिवासी सेवाभावी संस्थेच्या बालकाश्रमाचे अध्यक्ष डाॅ. अरुण इथापे यांनी दिली.