आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हा रुग्णालय दिवाळी सुटीत देणार अखंडित सेवा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - दिवाळीच्या सुटीमध्ये शासकीय कार्यालयांना चार दिवस सलग सुट्या अाल्याने या सर्व कर्मचाऱ्यांची दिवाळी जोरात साजरी होणार असली, तरी आरोग्य विभाग यास अपवाद ठरला आहे. दिवाळीच्या सुटीमध्येही बाह्यरुग्ण विभाग सुरू ठेवण्यात येणार आहे. या कालावधीत रुग्णांना सेवा दिली जाणार असल्याने शहर आणि ग्रामीण भागातील रुग्णांना दिलासा मिळाला आहे. दरवर्षी सुरू असलेल्या या उपक्रमाचे वैद्यकीय अधिकारी, परिचारिका आणि चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनांनी स्वागत केले आहे.
अत्यावश्यक सेवा असलेल्या आरोग्य विभागाकडून दिवाळीला बाह्यरुग्ण विभाग सुरू ठेवण्यात येणार आहे. या काळात बाह्यरुग्ण विभाग, तत्कालीन कक्ष आणि अांतररुग्ण विभागातील सर्व रुग्णसेवा अखंडित सुरू राहणार आहे. बुधवार(दि. २६)पासून दीपोत्सवास सुरुवात झाली. शुक्रवारी बलिप्रतिपदा, शनिवारी नरक चतुर्दशी, रविवारी लक्ष्मीपूजन, सोमवारी बलिप्रतिपदा, मंगळवारी भाऊबीज साजरी होत आहे. शनिवारी (दि. २९) बाह्यरुग्ण विभाग नियमित सुरू होणार आहे. रविवारी (दि. ३०) सुटी, सोमवारी सकाळी ८.३० ते १२ या वेळेत बाह्यरुग्ण विभाग सुरू राहणार आहे. मंगळवारी सुटी राहणार आहे. बुधवारपासून नियमित बाह्यरुग्ण विभाग सुरू राहणार आहे. शहर आणि विशेषत: ग्रामीण भागातील रुग्णांचे हाल होणार नाही, याकरिता सुटीच्या दिवशी रुग्णसेवा सुरू ठेवण्याचा प्रस्ताव जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, अतिरिक्त शल्यचिकित्सक डॉ. जी. एम. होले यांनी वैद्यकीय अधिकारी, परिचारिका आणि चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनांपुढे ठेवला होता. यास सर्वांनी सकारात्मक प्रतिसाद देत सुटीच्या दिवशी रुग्णसेवा सुरू ठेवण्याच्या या उपक्रमास प्रतिसाद दिला.

रुग्णांनी घ्यावा रुग्णसेवेचा लाभ
^दिवाळीच्या सणोत्सवातही रुग्णसेवा सुरू ठेवण्यात आली आहे. सुटीच्या दिवशी ठरावीक कालावधीसाठी रुग्णसेवा सुरू राहणार असल्याने शहर ग्रामीण भागातील रुग्णांना सेवा मिळणार आहे. या रुग्णसेवेचा लाभ घ्यावा. -डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा शल्यचिकित्सक
बातम्या आणखी आहेत...