आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मैफलीतून ‘कमळ’ फुलविण्याचा प्रयत्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - पाडव्याच्या निमित्ताने पहाटेच्या समयी शहरात एकीकडे स्वर्गीय सुरांच्या मैफली फुलत असताना, दुसरीकडे याच मैफलींच्या माध्यमातून भाजपच्या ‘कमळा’लाही टवटवी देण्याचा प्रयत्न हाेत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात हाेत हाेती. पाडवा अाणि भाऊबीज या दिवशी झालेल्या बहुसंख्य मैफलींचे अायाेजक हे भाजपचेच पदाधिकारी हाेते. त्यामुळे यंदाचा पाडवा हा भाजपमय झाल्याची अनुभूतीही शहरवासीयांनी घेतली.

दीपावलीतील प्रात:कालच्या वातावरणात सुरांची शृंखला बांधण्याचा उपक्रम काही वर्षांपासून नाशिक शहरात पहाट पाडवा अन् सांज पाडव्याच्या निमित्ताने राबविला जात अाहे. संगीत क्षेत्रातील दर्दी अाणि कानसेन यांना अाकर्षित करणाऱ्या या मैफलींमुळे अायाेजकांच्या प्रसिद्धीतही वाढ हाेत असल्याचा अाजवरचा अनुभव अाहे. म्हणूनच या मैफलींचे अायाेजन करण्यात राजकीय मंडळींना माेठे स्वारस्य असते. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीच्या वेळी तर ‘प्रभाग तेथे मैफल’ असे चित्र हाेते. यात मनसेचे पदाधिकारी इच्छुक उमेदवारांची अाघाडी हाेती. विधानसभा निवडणुकीत नाशिकमधील तीनही जागा भाजपने पटकावल्यानंतर ‘हवा’ कायम टिकून राहावी म्हणून पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी अापल्या उपक्रमांतही वाढ केली. त्यातील प्रमुख उपक्रम म्हणून पाडवा पहाट अाणि सांज पाडवा मैफलींकडे बघितले जात अाहे. गेल्या पाच वर्षांची परंपरा कायम ठेवत भाजपचे मध्य नाशिक मतदारसंघातील अामदार देवयानी फरांदे यांनी प्रसिद्ध शास्त्रीय गायिका अारती अंकलीकर यांच्या मैफलीचे पाडव्याला अायाेजन केले हाेते. दुसरीकडे मनसेतून भाजपमध्ये प्रवेशित झालेले भाभानगर मित्रमंडळाचे सर्वेसर्वा तथा माजी अामदार वसंत गिते यांनीही याच दिवशी वैशाली म्हैसणे-माडे अाणि राहुल सक्सेना यांची मैफल अायाेजित केली. मनसेतूनच भाजपमध्ये पदार्पण केलेले नगरसेवक सतीश कुलकर्णी यांनी युनिक ग्रुपच्या माध्यमातून इंदिरानगरवासीयांना हिंदी, मराठी गीतांची मेजवानी दिली. भाजपच्या शहराध्यक्षपदाच्या स्पर्धेत असलेले सुरेशअण्णा पाटील यांनी गाेदाश्रद्धा फाउंडेशनच्या वतीने वैशाली माडे अाणि नंदेश उमप या कालाकारांची मैफल घेतली. या मैफलींना भाजपचे पदाधिकारीही माेठ्या संख्येने उपस्थित हाेते. त्यामुळे मैफलींना अापसूक भाजपचा रंग चढला नसेल तर नवलच.

या पदाधिकाऱ्यांनीही घेतल्या मैफली
भाजप व्यतिरिक्त अन्य पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनीही मैफलींचे अायाेजन केले हाेते. शिवसेनेचे महानगरप्रमुख अजय बाेरस्ते यांनी सलील कुलकर्णी अाणि संदीप खरे यांची ‘गाणे मनातली’ कार्यक्रम घेतला. मनसेच्या नगरसेविका दीपाली कुलकर्णी यांनी इंदिरानगरला पं. अविराज तायडे यांच्या मैफलीचे अायाेजन केले. शिवसेनेचे नगरसेवक सचिन मराठे यांनी काठे गल्ली परिसरात ‘दीपाेत्सव सांज पाडवा’ची मेजवानी दिली. तर, खुटवडनगर येथे माकपचे नगरसेवक तानाजी जायभावे यांनी ‘शब्द मल्हार सांज पाडवा’चे अायाेजन केले हाेते.