आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीपावलीतील पणत्यांतून मिळणार ‘पाॅझिटिव्ह’ प्रकाश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - प्रकाशाची,उत्साहाची, चैतन्याची उधळण करणारा सण म्हणजे दिवाळी. दिवाळी हा नुसता सण नाही, तर मनातील नकारात्मक वृत्तींना विसरायला लावून जगण्यास प्रोत्साहित करणारा आनंदोत्सवच असताे. तिमिराकडून तेजाकडे नेणाऱ्या या उत्सवातून अायुष्याकडे ‘पाॅझिटिव्ह’ दृष्टिकाेनाने बघा, असे सांगणाऱ्या एचअायव्ही बाधित महिला सध्या छानशा पणत्या बनविण्यात व्यस्त अाहेत. या महिलांनी यंदा एक नव्हे, तब्बल २० हजार पणत्या अाणि भेटकार्ड तयार करून अापल्यातील कलेचा अाविष्कार पेश केला अाहे.
दिवाळीचा सण कुणी झोपडीच्या अंगणात इवलीशी पणती पेटवून, तर कुणी गर्भश्रीमंत हजार दिव्यांची माळ लावून हा सारा प्रकाश आपल्यात सामावून घेत असतो. कुणी रांगोळीचे हजार ठिपके काढून, तर कुणी आकाशदिवे लावून आपल्यातला उजेडच एका अर्थाने व्यक्त करत असतो. असा हा प्रकाशाचा सण अधिक तेजस्वी करण्याकरिता महिंद्रा अॅण्ड महिंद्रा यश फाउंडेशनच्या महिला प्रयत्नशील अाहेत. एचअायव्ही बाधितांनी नकारात्मक मानसिकतेतून बाहेर निघून सकारात्मक मार्ग चाेखाळण्यासाठी ही संस्था विशेष प्रयत्न करीत असते. संस्थेतील एचअायव्ही बाधित महिलांनी दिवाळीसाठी यंदा छान पणत्या तयार केल्या अाहेत. स्वस्तिक, फुले, बदाम अशा २० प्रकारच्या नक्षीदार पणत्यांची रासच सध्या संस्थेच्या गंगापूरराेडवरील कार्यालयात लागलेली दिसते. या शिवाय वारली चित्रकलेत बनविलेले अाकर्षक भेटकार्डदेखील येथे गेल्यावर लक्ष वेधून घेतात. या महिलांनी बनविलेल्या कापडी पिशव्या दिवाळीचा फराळ अाणि भेटवस्तू नेण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात. अधिक माहितीसाठी ९२२५८१७६२७ या क्रमांकावर संपर्क साधावा.

..तर महिलांची दिवाळी हाेईल गाेड
^दिवाळीत आसमंतातील अंधकार दूर होतो. तसा आपल्या मनातील अंधकार, निराशा दूर होऊन मनात आनंदाच्या, नवीन विचारांच्या ज्योत प्रज्वलित करण्यासाठी अाम्ही हा उपक्रम राबवताे. यातून मिळणारा सर्वच निधी संबंधित महिलांच्या सबलीकरणासाठी वापरला जाणार अाहे. याच पैशातून या महिलांची दिवाळी गाेड हाेणार अाहे. रवींद्र पाटील, अध्यक्ष, महिंद्रा यश फाउंडेशन
बातम्या आणखी आहेत...