आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवाळीच्या काळातसुद्धा एसटी राहिली ताेट्यातच, अवैध वाहतूक राेखण्यात अपयश

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- प्रचंड वाढलेली महागाई या वर्षी अाणि ग्रामीण भागात पडलेला कमी पाऊस याचा फटका दिवाळीच्या कालावधीत एस. टी. महामंडळास बसला असून, ग्रामीण भागातील एसटी महामंडळाच्या वतीने करण्यात आलेली नियमित तसेच विशेष फेऱ्यांच्या माध्यमातून नियोजन केलेली बहुतांश वाहतूक ताेट्यात गेली अाहे.
सिंहस्थ कुंभमेळा अाणि नवरात्राेत्सव काळात एस. टी. महामंडळाने ते २५ नाेव्हेंबरपर्यंत दिवाळीसाठी विशेष गाड्या सोडल्या आहेत. मात्र, अपेक्षित प्रवासी मिळाल्याने एसटीला िदवाळीच्या काळात देखील अार्थिक ताेटा सहन करावा लागला अाहे.

भाडेवाढ करून झालेला ताेटा दिवाळीत भरून काढता येईल, असा एसटी महामंडळाचा हाेरा हाेता. मात्र, ही भाडेवाढ एसटीच्या चांगलीच अंगलट अाली असून, पहिल्या टप्प्यात प्रवासीच मिळाले नसल्याची कबुली एसटीच्या अधिकाऱ्यांनी दिली अाहे. भाऊबिजेलादेखील एसटीला प्रवासी मिळाले नाहीत, परंतु त्यानंतर रविवारी बसेस फुल्ल झाल्याचे दिसले. यातून नाशिक विभागास तब्बल एक कोटी २० लाख रुपये उत्पन्न मिळाले. हे यंदाच्या दिवाळी कालावधीतील सर्वाधिक ठरले अाहे.एकंदरच उत्पन्नवाढीसाठी याेजलेला उपाय एसटीच्या अंगलट अाला अाहे.

अवैध वाहतुकीचाही बसला फटका
बसस्थानकअाणि बसस्थानक परिसरातून खासगी वाहनांच्या एजंटांकडून प्रवासी पळवले जात असल्याने एसटीला अार्थिक ताेटा सहन करावा लागत अाहे. याकडे एसटी प्रशासनाने लक्ष देण्याची गरज असताना, मात्र याकडे सर्रास दुर्लक्ष हाेत असल्याचे िदसून येत अाहे.