आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिककरांचा ‘दिवाळी शाॅपिंग संडे’, शाळांना आजपासून सुटी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - चार दिवसांवर येऊन ठेपलेल्या दिवाळीच्या पार्श्वभूमीवर नाशिककरांनी रविवारी खऱ्या अर्थाने ‘शाॅपिंग संडे’ साजरा केल्याचे चित्र शहरातील प्रमुख बाजारपेठांत पाहायला मळत हाेते. शहरातील मेनराेड, रविवार कारंजा, नाशिकराेड, सिडकाेत कपडे, दिवाळीसाठी लागणािऱ्या किराणा वस्तू, उटणे, पणत्या, विजेच्या दीपमाळा यांच्या खरेदीकरिता प्रचंड गर्दी पाहायला मिळत हाेती. अनेक दुकानांत तर उभे राहायलाही दिवसभर जागा नव्हती. एकूणच बाजारात दिवाळीचा माहाेल तयार झाला असून, भाऊबिजेपर्यंत ताे कायम रहाणार असून, काेट्यवधींची उलाढाल हाेणार अाहे.
बुधवारी (दि. २६) वसुबारसपासून या दीपाेत्सवाला सुरुवात होत अाहे. नाेव्हेंबरच्या भाऊबिजेला हा सण संपत अाहे. वर्षातील हा सर्वात माेठा सण असल्याने अाणि बहुतांश शाळांनाही सुट्या लागल्याने रविवारचा दिवस गृहिणींनी कपडे अाणि किराणा खरेदीकरिता मार्गी लावला. नाशिकची परंपरागत बाजारपेठ असलेल्या रविवार कारंजा अाणि मेनराेडसह विविध माॅल्समध्येही माेठी गर्दी दिवसभर रात्री उशिरापर्यंत पाहायला मिळत हाेती. मेनराेडवर तर सायंकाळनंतर चालायलाही जागा नव्हती. गतवर्षाच्या तुलनेत दिवाळी फराळाच्या किराणा वस्तू पंचवीस टक्क्यांच्या अासपास महागलेल्या असल्या तरी खरेदीचा उत्साह कुठेही कमी झाला नसल्याचे चित्र हाेते.

वाहनविक्री दालनांतही गर्दी : दुचाकीचारचाकी वाहनाची विक्री प्रत्येक सणाला विक्रीचा उच्चांक नाेंदवत असून, यावर्षी दसऱ्याच्या मुहूर्तावर पाच हजार दुचाकींची विक्री नाेंदविली गेली हाेती, त्याचे रेकाॅर्ड दिवाळीला तुटेल, अशी शक्यता व्यावसायिक व्यक्त करीत अाहेत. कारच्या खरेदीकरिता ९० ते १०० टक्क्यांपर्यंत कर्ज देण्याची सुविधा वित्तीय संस्थांनी केल्याने वाहनविक्रीला चालना मिळाली अाहे.

हाेम अप्लायन्सेसची दालनेही गजबजली :टीव्ही, रेफ्रिजरेटर, एअरकंडीशनर, वाॅशिंग मशिन्स, मायक्राेवेव्ह अाेवन यांसारख्या गृहाेपयाेगी वस्तूंनाही मागणी वाढू लागली असून, विक्री दालने गजबजली अाहेत. कंपन्या अाणि वितरक यांनी दिलेल्या अाकर्षक अाॅफर्स, कमीत कमी दरात उपलब्ध असलेल्या अर्थसहाय्य यामुळे या वस्तूंची विक्री यंदा वाढणार अाहे.

दाेन वेतन अाणि एक बाेनसचा परिणाम
दिवाळीएेन महिन्याच्या शेवटच्या अाठवड्यात अाल्याने या महिन्यात बहुतांश कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना दाेन महिन्यांचे वेतन बाेनसही मिळाला अाहे. त्याचा सकारात्मक परिणाम क्रयशक्ती वाढण्यात पाहायला मिळताे अाहे. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना सातवा वेतन अायाेग जाहीर झाला असून, लवकरच फरक हाती पडणार अाहे, त्याचाही सकारात्मक परिणाम बाजारावर झाला.

बातम्या आणखी आहेत...