आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीपावली पर्वाला अाजपासून प्रारंभ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - घरातनव्याने आलेल्या धान्यरूपी दौलतीचे अाणि ते अाणण्यात माेलाची भूमिका बजावणाऱ्या गोधनाची कृतज्ञता व्यक्त करण्यापासून अर्थात ‘वसुबारस’पासून दीपाेत्सवाचे पर्व साजरे केले जाते. दिवाळी सणाची सुरुवात ‘वसुबारस’पासून होते आणि ‘भाऊबीज’ साजरी केल्यानंतर दिवाळीची सांगता होते. दीपाेत्सवाच्या या साेहळ्याला अाजपासून अर्थात वसुबारसपासून प्रारंभ हाेत अाहे.
‘वसुबारस’ म्हणजे सवत्सधेनू अर्थात गाय आणि वासरू यांची पूजा करण्याचा दिवस. या दिवशी गाय आणि वासरू यांची पूजा केली जाते. त्यांना गोडाचा घास खाऊ घालून त्यांच्याप्रति असलेली कृतज्ञता व्यक्त केली जाते. गोठ्यातील गाय, बैल, म्हशी हीच शेतकऱ्यांची खरी धनदौलत असल्याची भावना अापल्याकडे कृषीसंस्कृतीतून रुजली अाहे . या गोधनाची कृतज्ञपणे पूजा म्हणजे ‘कृषीसंस्कृती’ने आपल्याच मूळ ‘मातृप्रधान संस्कृती’ला दिलेली मानवंदना असल्याचेही मानले जाते.

नाशकातविविध संस्थांमध्ये पूजन : नाशिकमधीलपंचवटी, पाथर्डी येथील पांझरापाेळ, अानंदवलीतील बालाजी मंदिरात तसेच पाेद्दार यांच्या दिंडाेरी राेडवरील नंदिनी गाेशाळेमध्ये गाय - वासराचे पूजन करण्याची प्रथा अाहे. गाेरज मुहूर्तावर गाय अाणि वासराला अाेवाळून त्याला गाेडाचा घास खायला देण्याची परंपरा अाजही पाळली जाते.

शुक्रवारीधनत्रयाेदशी : देशातीलकृषीसंस्कृतीनुसार शेतकऱ्यांच्या दृष्टीने खळ्यात लागलेल्या नवीन धान्याच्या राशी हेच त्यांचे धन असते. त्यामुळे हे ‘धन’रूपी ‘धान्य’ घरात आलेलं असल्याने या नवीन धान्याची पूजा करण्याचा दिवस ती धनत्रयोदशी.
धनाच्या राशीसह घरातील देवांना नैवेद्याला ठेवला जाणारा धने-गुळाचा प्रसाद यालाही महत्त्व आहे. अायुर्वेद या भारतीय शास्त्रानुसार या शास्त्राचा उदगाता मानला जाणाऱ्या भगवान धन्वंतरीचे पूजन वैद्यांकडून केले जाते.

शेतकऱ्यांकडून घराेघरी पूजन
शहराच्यापरिघात निवास करणाऱ्या बहुतांश शेतकरी कुटुंबातदेखील साग्रसंगीतपणे या परंपरेचे पालन केले जाते. तसेच, शहरातील अनेक भगिनीदेखील अासपासच्या परिसरातील गाय-वासराचे पूजन करून त्यांना अाेवाळतात. गाेधनाबाबतची कृतज्ञता जपण्याच्या या परंपरेचे पालन करतानाच अनेक शेतकरी कुटुंबांमध्ये या दिवशी गाेठ्यातील सर्व कामे पुरुषच करून कुटुंबातील माता - भगिनींबाबतही कृतज्ञता व्यक्त केली जाते.
बातम्या आणखी आहेत...