आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘डीएक्स’ टोळीचा जेलरोडला धुमाकूळ

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकरोड - गुन्हेगार पुन्हा सक्रिय होऊन पोलिसांना आव्हान दिल्याचा प्रकार मंगळवारी मध्यरात्री जुना सायखेडारोड परिसरात घडला. साईश्रद्धा सोसायटीत धुमाकूळ घालत समाजकंटकांनी पार्किंगमधील दोन चारचाकी व सात दुचाकी वाहनांचे नुकसान केले.
वाहनांचे सीट फाडत त्यावर ‘डीएक्स’ असे लिहून नवीन गुन्हेगारी टोळी कार्यरत झाल्याचे संकेतही दिले.सकाळी हा प्रकार उघड झाल्यानंतर रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले. घटनेची माहिती मिळताच सहायक आयुक्त डॉ. डी. एस. स्वामी, वरिष्ठ निरीक्षक हेमंत सामंत यांनी भेट दिली. हवासिंग हनुमानराम कादयान (साईश्रद्धा सोसायटी, पुष्पकनगर) यांच्या फिर्यादीवरून उपनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
या वाहनांचे नुकसान
इनोव्हा (एम.एच. 15, डी.एस. 7728) कारची मागची काच फोडण्यात आली. तर मारुती (एम.एच. 15, डी.एस. 1075) कारच्या बोनेटवर खरडण्यात आले. प्लॅटिना (एम.एच. 15, सी.पी. 5251), हिरो होंडा (एम.एच. 15, डी.जे. 3964), (एम.एच. 15, सी. डी. 4114), (एम. एच. 15, डी. बी. 7817), अ‍ॅक्टिव्हा (एम. एच. 15 सी. आर. 7110), पॅशन (एम. एच. 15, सी. एल. 2603) व पल्सर (एम. एच. 15, सी. पी. 4657) या दुचाकी वाहनांच्या पेट्रोलचे पाइप कापले. त्यामुळे सर्व वाहनांतील पेट्रोलची गळती झाली. तसेच, सीटही फाडले.

गुन्हेगार पुन्हा झाले सक्रिय...
समाजकंटकांनी प्रभाग 32 मध्ये दहशत निर्माण केली आहे. काही वर्षांपूर्वी सिडकोत घडलेल्या प्रकाराचीच ही पुनरावृत्ती आहे. गुन्हेगारांचे कर्दनकाळ ठरलेले सहायक आयुक्त डॉ. डी. एस. स्वामी यांची बदली होताच गुन्हेगार सक्रिय झाले आहेत. - शैलेश ढगे, नगरसेवक